मुंबईतील कोळीवाड्यांचे सीमांकन तीन महिन्यांत पूर्ण करणार; महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा

मुंबई : मुंबई शहरातील सात कोळीवाड्यांच्या सीमांकनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाने उच्चस्तरीय समिती गठित केली आहे. कोकण विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती सीमांकनाच्या मोजणी नकाशांवर प्राप्त झालेल्या हरकतींचा विचार करून तीन महिन्यांच्या आत शासनाला शिफारस अहवाल सादर करणार आहे. मुंबईतील शिवडी, सायन, कुलाबा, माहिम (माहिम मार्केटसह), मांडवी-प्रिन्सेस डॉक, वरळी आणि कफ परेड या सात कोळीवाड्यांच्या सीमांकनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.


मुंबईतील कोळीवाड्यांच्या सीमांकनासाठी यापूर्वी प्रत्यक्ष स्थळपाहणी व मोजणी करून नकाशे तयार करण्यात आले होते. या नकाशांमध्ये दर्शविलेल्या सीमांबाबत विविध प्राधिकरणांकडून हरकती नोंदविण्यात आल्या होत्या. त्यामुळे सीमांकन अंतिम करण्यासाठी शासनाने समिती गठित करण्याचा निर्णय घेतला आहे. कोकण विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत जमाबंदी आयुक्त तथा संचालक, भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य, पुणे; बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (शहर); मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी; शहर अभियंता नगर अभियंता खाते बृहन्मुंबई महानगरपालिका, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे संचालक; तसेच मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त यांचा समावेश आहे. कोकण प्रदेशाचे उपसंचालक, भूमी अभिलेख हे समितीचे सदस्य सचिव आहेत.



समिती मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाने तयार केलेल्या सात कोळीवाड्यांच्या सीमांकनाच्या मोजणी नकाशांचा विचार करेल. या नकाशांवर प्राप्त झालेल्या हरकतींबाबत संबंधित हरकतदार आणि कोळी संघटनांच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेण्यात येणार आहे. त्यानंतर सीमांकन अंतिम करण्याबाबत शासनाला शिफारस केली जाईल. याशिवाय, महसूल विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ९ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या बैठकीतील निर्देशांच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाहीचाही समिती विचार करणार आहे. गरजेनुसार संबंधित अधिकारी आणि तज्ज्ञ व्यक्तींना बैठकीसाठी निमंत्रित करण्याचे अधिकार समितीला देण्यात आले आहेत. समितीने आपला स्वयंस्पष्ट शिफारस अहवाल शासनाला तीन महिन्यांच्या मुदतीत सादर करायचा आहे.


१२ वर्षे प्रलंबित प्रश्नाला न्याय


या निर्णयाबाबत बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, कोळीबांधव हे मुंबईचे मूळ रहिवासी असून त्यांच्या हक्कांचे रक्षण करणे हे सरकारचे आद्य कर्तव्य आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर तातडीने अंमलबजावणी करत हा आदेश काढण्यात आला आहे. १२ वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागणार आहे. या ९ सदस्यीय समितीला तीन महिन्यांच्या आत अत्यंत पारदर्शक पद्धतीने अभ्यास करून आपला स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोणत्याही कोळीबांधवाच्या हक्कावर गदा येऊ न देता त्यांच्या जमिनीचे रक्षण आणि विकासकामे वेगाने पूर्ण करण्यासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे बावनकुळे यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

Deepika Padukone : मानसिक आरोग्यासाठी पीव्ही सिंधू आणि दीपिका पादुकोण एकत्र! ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूचे कपडे फक्त ८५० रुपयांत विक्रीसाठी उपलब्ध

मुंबई : जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि भारताची स्टार

मुंबईतील झगमगाटावर निर्बंध? प्रकाश प्रदूषण रोखण्यासाठी उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश

मुंबई हे शहर दिवसरात्र गजबजलेलं असतं. रात्रीच्यावेळी मुंबईत खास करून दक्षिण मुंबई तसेच वांद्रे परिसरात झगमगते

Banganga Tank News : बाणगंगा तलावात माशांच्या सामूहिक मृत्यूनंतर खळबळ; पितृपक्षाच्या शेवटी बॅरिकेट्सच्या सावलीत पार पडले शेकडो भाविकांचे श्राद्ध

मुंबई : दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वाळकेश्वर भागातील प्राचीन बाणगंगा तलावात (Mumbai Banganga Tank) काही दिवसांपूर्वी माशांचा

Sion railway bridge news : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! सायन रेल्वे उड्डाणपूल अधिकृत उद्घाटनापूर्वीच चर्चेत; सोशल मीडियावरील रीलमुळे पालिका सतर्क

मुंबई : मुंबईतील बहुप्रतिक्षित आणि अतिशय महत्त्वाचा असा सायन रेल्वे उड्डाणपूल (Sion ROB) अजून लोकांच्या वापरासाठी

खाकीचा सन्मान! राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते 103 पोलीस अधिकारी व जवानांना पदके प्रदान

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील लोक भवन येथे एका दिमाखदार

Mumbai Water Supply : धरणातील गाळ काढण्याची गरज... प्रशासनाने दिलेला अभिप्राय स्थायी समितीने परत पाठवला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील गाळ काढून त्यातील पाणलोट क्षेत्र वाढवणे हे