मुंबई: धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने मुंबई CSMT ते नागपूर स्थानकादरम्यान रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दोन विशेष एक्सप्रेस चालवल्या जाणार आहेत. 18 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर पर्यंत या विशेष एक्स्प्रेस चालवल्या जाणार आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने या दोन्हीही एक्स्प्रेसचे टाईमटेबल त्यांच्या सोशल मिडिया पेजवर शेअर करत प्रवाशांना माहिती दिली आहे.
कर्जत: कर्जत- पनवेल रेल्वे मार्गिकेबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कर्जत, पनवेल आणि रायगड जिल्ह्यातील प्रवासी ...
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मोठ्या प्रमाणावर बौद्ध अनुयायी नागपूरच्या दिक्षा भूमीवर दर्शनासाठी जात असतात. दर्शनासाठी संपूर्ण देशभरातून लाखो अनुयायी दर्शनासाठी येत असतात. त्याच अनुषंगाने मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई CSMT ते नागपूर स्थानकादरम्यान तीन विशेष रेल्वे चालवल्या जाणार आहेत. मुंबई CSMT- नागपूर- मुंबई CSMT स्थानक दरम्यान 01219 डाऊन 18 ऑक्टोबर रोजी तर, 01220 अप 19 ऑक्टोबर रोजी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई CSMT स्थानकावरून 18 तारखेला दुपारी 02.30 वाजता सुटेल आणि नागपूर स्थानकावर ही एक्स्प्रेस 19 तारखेला सकाळी 06.10 वाजता पोहोचेल. तर, परतीच्या प्रवाशासाठी 19 तारखेला नागपूरवरून रात्री 10.30 वाजता सुटेल आणि 20 नोव्हेंबरला संध्याकाळी 5.30 वाजता मुंबई CSMT स्थानकावर पोहोचेल.
🚆 Special Trains for Dhamma Chakra Pravartan Din – Nagpur Jn 2026
To facilitate passengers travelling for Dhamma Chakra Pravartan Din at Nagpur Jn, Central Railway will operate special services between CSMT and Nagpur Jn:
🔹 01019/01020 CSMT–Nagpur Jn–CSMT Special
📅 19.10.2026 & 21.10.2026
🔹 01219/01220 CSMT–Nagpur Jn–CSMT Special
📅 18.10.2026
Plan your journey in advance and travel comfortably.
#DhammaChakraPravartanDin #SpecialTrain
— DRM Mumbai CR (@drmmumbaicr) October 7, 2026
या एक्स्प्रेससोबत आणखी एक एक्स्प्रेस चालवली जाणार आहे. मुंबई CSMT- नागपूर- मुंबई CSMT स्थानक दरम्यान 01019 डाऊन 19 ऑक्टोबर आणि 21 ऑक्टोबर रोजी तर, 01020 अप 20 ऑक्टोबर आणि 22 ऑक्टोबर रोजी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई CSMT स्थानकावरून 19 ऑक्टोबर आणि 21 ऑक्टोबरला दुपारी 02.30 वाजता सुटेल आणि नागपूर स्थानकावर ही एक्स्प्रेस 20 ऑक्टोबर आणि 22 ऑक्टोबरला सकाळी 06.10 वाजता पोहोचेल. तर, परतीच्या प्रवाशासाठी 20 ऑक्टोबर आणि 22 ऑक्टोबरला नागपूरवरून रात्री 10.30 वाजता सुटेल आणि 21 ऑक्टोबर आणि 23 ऑक्टोबरला संध्याकाळी 5.30 वाजता ही एक्स्प्रेस मुंबई CSMT स्थानकावर पोहोचेल. प्रवाशांच्या दृष्टीने ही एक्स्प्रेस फायद्याची ठरणार आहे. त्यामुळे जर तुम्ही सुद्धा 20 ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरला जाण्याच्या विचारात असाल तर ह्या स्पेशल एक्स्प्रेसने प्रवास करू शकाल.
मुंबई, दि. १२ : राज्य उत्पादन शुल्कच्या कोकण विभागीय भरारी पथकाने ऐरोली रेल्वेस्थानकासमोरील बेलापूर-ठाणे मार्गावर परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक ...
या तिन्ही स्पेशल एक्स्प्रेस दादर, ठाणे, कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड जंक्शन, चाळीसगाव जंक्शन, पाचोरा जंक्शन, जळगाव जंक्शन, भुसावळ जंक्शन, मलकापूर, शेगाव, अकोला जंक्शन, मुर्तीजापूर जंक्शन, बडनेरा जंक्शन, धामणगाव, पुलगाव, वर्धा जंक्शन आणि अजनी या स्थानकावर थांबा घेत एक्स्प्रेस पुढे रवाना होईल. रेल्वेकडून अद्याप या दोन्हीही एक्सप्रेसचं रिझर्व्हेशन प्रोसेस सुरू झाली आहे की नाही? याबद्दल माहिती दिलेली नाही. त्यामुळे प्रवाशांनी IRCTC च्या वेबसाईटवरून किंवा आपल्या जवळच्या रेल्वे स्थानकाच्या तिकिट बुकिंग काऊंटवरून याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्या.