Karjat- Panvel Local: कर्जत- पनवेल मार्ग केव्हापासून सुरू होणार? आली महत्त्वाची अपडेट; वाचा सविस्तर माहिती

कर्जत- पनवेल रेल्वे मार्गिकेबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून असलेल्या कर्जत, पनवेल आणि रायगड जिल्ह्यातील प्रवाशांची प्रतिक्षा संपणार आहे.

कर्जत: कर्जत- पनवेल रेल्वे मार्गिकेबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कर्जत, पनवेल आणि रायगड जिल्ह्यातील प्रवासी लोकलच्या प्रतिक्षेत आहेत. आता लवकरच या मार्गावरील प्रवाशांची प्रतिक्षा संपणार आहे. येत्या डिसेंबर 2026 पर्यंत कर्जत- पनवेल रेल्वे मार्गिका पूर्ण होण्याच्या तयारीत आहे. त्या दृष्टीने पूर्ण क्षमतेने लोकल सेवा सुरू करण्याची तयारी केली जात आहे. कर्जत- पनवेल मार्गावर पहिल्या टप्प्यात 50 लोकल धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून देण्यात आली आहे. नेमकी कशा पद्धतीने ही लोकल सेवा आहे, जाणून घेऊया...






डिसेंबर 2026 पासून कर्जत- पनवेल रेल्वे मार्गावर लोकल सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. दिवाळीपर्यंत संपूर्ण काम पूर्ण होणार असून डिसेंबरपासून प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर जलद आणि सोयीस्कर होणार आहे. डिसेंबर 2026 पासून रेल्वे सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासन प्रयत्न करत आहे. 2 हजार 782 रूपये खर्च करून मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून एमयुटीपी- 3 अंतर्गत कर्जत- पनवेल मार्गिकेवर काम केले जात आहे. रेल्वे सेवा सुरू करण्यापूर्वी मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळाकडून तांत्रिक चाचण्या घेतल्या जाणार आहेत. चाचण्या पूर्ण झाल्यानंतर कर्जत- पनवेल मार्गिकेला अंतिम मान्यता दिली जाणार आहे.






मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्जत- पनवेल मार्गिका येत्या डिसेंबर महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. अद्याप तारीख समोर आलेली नसून प्रवाशांच्या दृष्टीने लवकरात लवकर कर्जत- पनवेल मार्ग सुरू करण्याच्या तयारीत आहे. कर्जत- पनवेल रेल्वे मार्गावर पहिल्या टप्प्यामध्ये 50 लोकल धावणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये रेल्वेकडून 12 डब्ब्यांच्या लोकल चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहून रेल्वेकडून 15 डब्ब्यांच्या लोकलचा आणि एसी लोकलचा विचार केला जाणार असल्याची माहिती आहे. कर्जत- पनवेल मार्गावरील काम सध्या 99 टक्के पूर्ण झाले असून त्या दृष्टीने रेल्वेकडून पुढच्या उपाययोजना आखल्या जात आहेत.






दरम्यान, कर्जत- पनवेलदरम्यान दुहेरी रेल्वे मार्गिकेवर कर्जत, चौक, पोयंजे, चिखले आणि पनवेल अशी 5 स्थानके उभारण्यात आली आहेत. या मार्गावर रेल्वेकडून 3 बोगदे, 5 उड्डाणपूल आणि 16 भुयारी मार्ग उभारण्यात आले आहेत. 29.6 किलोमीटर लांबीच्या ह्या मार्गिकेवर 3.164 किमीवर 3 बोगदे आहेत. त्यामध्ये 2.625 किमी लांबीचा वावर्ले बोगदा हा मुंबई उपनगरीय रेल्वेतील सर्वात लांब बोगदा आहे. कर्जत- पनवेल मार्गिकेसाठी थेट कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे हा प्रवास फार खर्चिक आणि वेळखाऊ होता. पण आता ही रेल्वे मार्गिका सुरू झाल्यानंतर प्रवाशांना प्रवास करणं सोयीस्कर होईल.

Comments
Add Comment

Indian Railways News: ट्रेनचे जुने डबे आता भंगारात नाही, तर रेस्टॉरंटमध्ये! रेल्वेची कमाईची अनोखी शक्कल

भारतीय रेल्वे ही केवळ प्रवासाचे साधन नसून देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. दररोज लाखो प्रवासी

लग्नाआधी त्वचेवर आणा नैसर्गिक चमक! 2 चमचे बेसनपासून तयार करा घरगुती ब्राइडल स्क्रब

लग्नसराईच्या दिवसांत होणारी नवरी तात्काळ चमक आणि सतेज त्वचा मिळवण्यासाठी काही महिने आधीपासूनच महागडे फेशियल,

Swiggy Instamart: स्विगीच्या इन्स्टामार्टमध्ये मोठी पुनर्रचना, 340 कर्मचाऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता

देशातील आघाडीची फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीने आपल्या क्विक कॉमर्स विभाग इन्स्टामार्टमध्ये मोठी कपात करण्याचा

MPSC Group C Exam 2026 : MPSC गट-क परीक्षेच्या अर्जासाठी मुदतवाढ; आता 29 नोव्हेंबरपर्यंत करता येणार अर्ज

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 (MPSC Group C Exam 2026) साठी अर्ज करण्याची

Bandra Station: वांद्रे स्थानकाला 162 वर्षे पूर्ण; तीन दिवसीय ‘बांद्रा स्टेशन महोत्सव 2026’ ला उत्साहात सुरुवात

Bandra Station: मुंबईच्या ऐतिहासिक वांद्रे रेल्वे स्टेशनने १६२ वर्षांचा टप्पा गाठला आहे. या निमित्ताने पश्चिम

NCMC Card : एसटीच्या NCMC स्मार्ट कार्डमध्ये आता फक्त 5 रुपयांचा टॉपअप; प्रवाशांना मोठा दिलासा

NCMC Card : एसटी महामंडळाने एनसीएमसी स्मार्ट कार्ड वापरणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय