Malegaon Sugar Factory : माळेगाव साखर कारखान्याच्या 70 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; अजितदादांचा वारसा पुढे नेणार, सुनेत्रा पवारांची ग्वाही

स्वर्गीय अजित पवार यांनी सहकार क्षेत्रात केलेले काम आणि त्यांनी दाखवलेला मार्ग पुढे सुरू ठेवणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 70 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ आणि गव्हाण पूजन उपमुख्यमंत्री तथा कारखान्याच्या चेअरमन सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते 12 ऑक्टोबर रोजी करण्यात आले. यावेळी त्यांनी शेतकरी सभासदांचे हित जपणे, कामगारांच्या योगदानाचा सन्मान करणे आणि कारखान्याची प्रगती साधणे याला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. स्वर्गीय अजित पवार यांनी सहकार क्षेत्रात केलेले काम आणि त्यांनी दाखवलेला मार्ग पुढे सुरू ठेवणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.



शेतकऱ्यांच्या कष्टाचे जाणीव ठेवणे गरजेचे


माळेगाव साखर कारखान्यावर अनेक शेतकरी सभासदांचे आर्थिक गणित अवलंबून आहे. त्यामुळे कारखान्याशी संबंधित प्रत्येक निर्णय घेताना शेतकऱ्यांच्या कष्टांची जाणीव ठेवणे गरजेचे आहे, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात चांगले ऊस उत्पादन व्हावे आणि सभासदांच्या कुटुंबात सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थनाही त्यांनी यावेळी केली.



अजित पवार यांचे कारखान्यासाठीचे योगदान आणि मार्गदर्शन मोलाचे होते. त्यांच्या निधनानंतर 12 मार्च रोजी आपल्याकडे चेअरमनपदाची जबाबदारी आली. अजितदादांनी सभासदांचे हित लक्षात घेऊन ज्या पद्धतीने काम केले, त्याच मार्गाने कारखान्याची वाटचाल सुरू ठेवण्याचा आपला प्रयत्न राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.


यंदा कारखान्याने सर्वाधिक ऊसदर दिल्याचा उल्लेख करत सुनेत्रा पवार यांनी आर्थिक शिस्तीचे महत्त्व अधोरेखित केले. कारखान्याच्या माध्यमातून लवकरच सीबीजी प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन असून, यामुळे भविष्यातील विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. कारखान्याच्या प्रगतीमध्ये कामगारांचे योगदान महत्त्वाचे असून, त्यांच्या मेहनतीचा योग्य सन्मान झाला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.


यंदा कमी पावसामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे कमी पाण्यात अधिक ऊस उत्पादन घेण्यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता जाणवू नये, यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.


सभासदांचे हित हेच कारखान्याचे हित असून, शेतकरी, कामगार आणि कारखान्याच्या विकासासाठी प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Vikram Pachpute : MPSC आंदोलन विद्यार्थ्यांसाठी की रोहित पवारांच्या राजकीय लॉन्चिंगसाठी ? विक्रम पाचपुतेंचा सवाल

Vikram Pachpute : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार

Maharashtra Weather : घामाच्या धारा आणि उकाड्याने महाराष्ट्र तापला,उष्णतेमुळे नागरिक हैराण!

महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यातील उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे.

उत्सवातील बचतीतून शेतकऱ्यांना मदत करा; देवी चरणी साकडे घालत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

ठाण्यातील प्रसिद्ध टेंभी नाका येथील ‘श्री जय अंबे माँ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळा’च्या आई दुर्गेश्वरीचे यंदा

कुंभमेळ्याच्या विकासकामांतून नाशिक-त्र्यंबकेश्वरचा चेहरामोहरा बदलणार; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून पाहणी

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण

दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये! अन्न व चाऱ्याच्या नियोजनावर मुख्यमंत्र्यांचा भर

राज्यात उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना

‘प्रहार’च्या लेखणीतून महाराष्ट्राच्या समृद्धीचा मार्ग खुला व्हावा! माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांची अपेक्षा

मुंबई : "एखादा माणूस श्रीमंत होण्यापेक्षा संपूर्ण कोकण समृद्ध होणे अधिक महत्त्वाचे आहे. कोकणासह महाराष्ट्रातील