Someshwar Karkhana Election : सोमेश्वर कारखान्यावर सुनेत्रा पवारांचे निर्विवाद वर्चस्व

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या गटाने मोठे यश मिळवल्याचा दावा केला जात आहे. 21 पैकी 21 जागांवर विजय मिळवत कारखान्यावर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केल्याची बातमी समोर आली आहे.

मुंबई : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने सर्वच्या सर्व 21 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनलसह ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गटालाही जोरदार धक्का दिला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी प्रथमच निवडणुकीच्या मैदानात उतरून मिळविलेला हा विजय बारामतीतील राजकीय वर्चस्वाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.


सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनलचे सर्व 21 उमेदवार विजयी झाले. संग्राम सोरटे, प्रमोद काकडे, अभिजीत काकडे आणि वसंतराव दगडे या चार उमेदवारांनी दुपारच्या सुमारासच विजय मिळविला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष सुरू झाला होता. त्यानंतर सायंकाळी मतमोजणीचे संपूर्ण चित्र स्पष्ट झाले आणि सुनेत्रा पवार यांच्या पॅनलने सर्व जागांवर विजय मिळविल्याचे निश्चित झाले. बारामतीमध्ये कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत विजयाचा आनंद साजरा केला.


या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी केलेले पुरुषोत्तम जगताप यांनी भाजपच्या मदतीने स्वतंत्र पॅनल उभे केले होते. मात्र, त्यांना मतदारांचा अपेक्षित पाठिंबा मिळविता आला नाही. गट क्रमांक दोनमध्ये जगताप पिछाडीवर होते. अखेर त्यांचाही पराभव झाला. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या पॅनलने जगताप यांच्या राजकीय आव्हानावर मात केली.

Comments
Add Comment

Jitendra Awhad : मतदारसंघ पुनर्रचनेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पाठिंबा, जितेंद्र आव्हाडांची माहिती

मुंबई : मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशनच्या विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा

BJP Leaders meet Sharad Pawar: 'डिलिमिटेशन' विधेयकासाठी भाजपची शरद पवारांशी चर्चा

मुंबई : संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनात मांडल्या जाणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा मिळवण्यासाठी

शरद पवार गटाकडून सर्व खासदारांना व्हीप जारी; मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर काय घडणार?

मुंबई : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या

Sunetra Pawar : क्रीडा संकुलांचा अखर्चित निधी अन्य संकुलांकडे वळविणार - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश

अनुदान मर्यादेबाहेरील प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर तातडीने मांडण्याचे आदेश मुंबई : राज्यातील विविध क्रीडा

महाविकास आघाडीच्या काळात गुन्हेगारीचा कळस! राऊत-ठाकरेंवर नवनाथ बन यांचा हल्लाबोल; 2020-21 ची आकडेवारी समोर?

मुंबई : पुण्यातील गोळीबाराची घटना शेतीच्या वादातून भावकीतील वैयक्तिक भांडणातून घडली असून ती खंडणीशी संबंधित

शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये केलं दाखल, सुप्रिया सुळेंनी दिली माहिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरचचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार ह्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना