शरद पवार गटाकडून सर्व खासदारांना व्हीप जारी; मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर काय घडणार?

संसदेच्या 30 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या 4 दिवसीय विशेष अधिवेशनापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाने लोकसभा खासदारांना 3 ओळींचा व्हीप जारी केला आहे. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांनी सखोल अभ्यासाची भूमिका मांडत पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाला पाठिंबा देण्याचा सूर आळवला आहे.

मुंबई : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या लोकसभा खासदारांना तीन ओळींचा व्हीप जारी केला आहे. संसदेच्या ३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या विशेष अधिवेशनात सर्व खासदारांनी उपस्थित राहावे आणि पक्ष जी भूमिका घेईल, त्याला पाठिंबा द्यावा, असे निर्देश या व्हीपद्वारे देण्यात आले आहेत. पक्षाचे मुख्य प्रतोद खासदार अमोल कोल्हे यांनी हा व्हीप जारी केला आहे. दरम्यान, मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत पक्षाच्या भूमिकेला बहुतांश जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा असल्याची माहिती समोर आली आहे.


केंद्र सरकारने ३० नोव्हेंबरपासून संसदेचे चार दिवसीय विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाशी संबंधित विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. या विधेयकाला मंजुरी मिळवण्यासाठी घटनादुरुस्तीची आवश्यकता असल्याने संसदेत दोनतृतीयांश बहुमत महत्त्वाचे ठरणार आहे. यापूर्वीही संसदेत मतदारसंघ पुनर्रचनेचे विधेयक मांडण्यात आले होते; मात्र त्याला मंजुरी मिळाली नव्हती. त्यामुळे यावेळी या विधेयकावर कोणते पक्ष कोणती भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांची गुरुवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार यांच्यासह विविध विभागांतील जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत पक्षाने घाईघाईने भूमिका घेऊ नये, तर त्यातील तरतुदी आणि संभाव्य परिणामांचा सखोल अभ्यास करून निर्णय घ्यावा, अशी भूमिका वरिष्ठ नेत्यांनी मांडल्याची माहिती आहे.


बैठकीत काही जिल्हाध्यक्षांनी अनेक मतदारसंघांमध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे मतदारसंघांचे विभाजन आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. विधेयकाबाबत शरद पवार आणि पक्षाचे नेतृत्व जो निर्णय घेईल, त्याला पाठिंबा देण्याची तयारी बहुतांश जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी दर्शविल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. नेतृत्वाने अंतिम निर्णय घेतल्यास तो मान्य असेल, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आल्याचे समजते. मात्र, विधेयकातील तरतुदी आणि त्याचे राज्यांवरील संभाव्य परिणाम तपासल्यानंतरच पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर केली जाणार असल्याचे वरिष्ठांनी स्पष्ट केल्याची माहिती आहे.


यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनीही मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावर भूमिका मांडली होती. सर्व राज्यांना समान पद्धतीने जागा मिळणार असतील, तर विधेयकाला पाठिंबा देण्याचा विचार करता येईल, असे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे विशेष अधिवेशनात विधेयक मांडले गेल्यास शरद पवार गट त्याला पाठिंबा देणार की काही अटी मांडणार, याबाबत उत्सुकता आहे.

Comments
Add Comment

Sunetra Pawar : क्रीडा संकुलांचा अखर्चित निधी अन्य संकुलांकडे वळविणार - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश

अनुदान मर्यादेबाहेरील प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर तातडीने मांडण्याचे आदेश मुंबई : राज्यातील विविध क्रीडा

महाविकास आघाडीच्या काळात गुन्हेगारीचा कळस! राऊत-ठाकरेंवर नवनाथ बन यांचा हल्लाबोल; 2020-21 ची आकडेवारी समोर?

मुंबई : पुण्यातील गोळीबाराची घटना शेतीच्या वादातून भावकीतील वैयक्तिक भांडणातून घडली असून ती खंडणीशी संबंधित

शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये केलं दाखल, सुप्रिया सुळेंनी दिली माहिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरचचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार ह्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना

India Japan Relations : जपानच्या ओकायामा प्रांताच्या शिष्टमंडळाची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट; महाराष्ट्र-जपान सहकार्यावर चर्चा

मुंबई : जपानमधील ओकायामा प्रांताचे राज्यपाल रयुता इबारागी आणि ओकायामा प्रांतीय विधानसभेचे अध्यक्ष मसाताका ओटा

मातोश्रीचा मागचा दरवाजा कशासाठी होता? टेम्पो आत कशासाठी यायचे? संजय राऊतांच्या लाचखोरीच्या आरोपांना मंत्री संजय शिरसाट यांचे प्रत्युत्तर

मुंबई: लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने लातूरमध्ये प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी पाच कोटी रुपयांची लाच

Supriya Sule: गेल्या 12 वर्षांपासून माझ्या शपथविधीच्या चर्चा, मला त्यात रस नाही; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांवर मिश्कील प्रतिक्रिया

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी