‘कॉकरोच’ माझे आदर्श नाहीत म्हणत उबाठा गटाच्या राष्ट्रीय प्रवक्त्याचा राजीनामा

उबाठा गटाला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांनी राजीनामा दिल्याची बातमी समोर आली आहे. ‘कॉकरोच माझे आदर्श नाहीत’ या विधानामुळे आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर घेतलेल्या आक्षेपांमुळे हा विषय चर्चेत आला आहे.

मुंबई : उबाठा गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांनी पक्षातील कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत सर्व पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपली मुस्कटदाबी सुरू असल्याचा आरोप करत, हिंदुत्व आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांवर मोकळेपणाने बोलता येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ‘कॉकरोच माझे आदर्श नाहीत,’ असे म्हणत त्यांनी पक्षाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.






2019 पासून आपण बाळासाहेब ठाकरे यांना आदर्श मानून प्रामाणिकपणे काम केले. मात्र, आता पक्षात आपले विचार मांडण्यावर मर्यादा येत असल्याचा आरोप दुबे यांनी केला. ध्रुव राठी आणि इमाम हे आपले आदर्श नसून स्मित मच्छार हे आदर्श असल्याचे सांगताना, त्यांच्या समर्थनार्थ पक्षाकडून एक पोस्टही केली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ‘हे कॉकरोच आमचे आदर्श कसे होऊ शकतात, हे ठरविण्याचा अधिकार कोणाला?’ असा सवालही त्यांनी केला.


महागाईसारख्या मुद्द्यांवर विरोधकांनी आवाज उठवावा; मात्र संपूर्ण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही. राजकीय मतभेद असले तरी व्यक्तिगत हल्ले टाळले पाहिजेत, असे मत दुबे यांनी मांडले. विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे नेते एकत्र चहा घेत असल्याचे फोटो दिसत होते; मात्र आता राजकारणात कटुता वाढल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. आपल्याला पक्षातून काढल्याचे बनावट पत्र प्रसारित झाले, तरी पक्षाने त्याचे खंडन केले नाही आणि आपल्यालाच खुलासा करावा लागला, असा आरोप दुबे यांनी केला. पक्षाची विचारधारा आणि सध्याची दिशा यांवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला. आपण अद्याप कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही; योग्य संधी मिळाल्यास विचार करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

BMC Health Policy : शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य योजनांचा लाभ, नागरी आरोग्य धोरणाचा मसुदा सार्वजनिक आरोग्य समितीसमोर सादर*=

मुंबई (विशेष प्रतिनिधी) BMC Health Policy : निरोगी मुंबई आणि भविष्यकालीन सज्जतेसाठी मुंबई महानगरपालिकेने नागरी आरोग्य

Mumbai Pune Expressway : प्रवाशांसाठी खुशखबर! अटल सेतू आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लवकरच जोडले जाणार, 67 टक्के काम पूर्ण

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणखी कमी होण्याची शक्यता आहे. अटल सेतूला थेट मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाशी

Jharkhand Accident News: पत्नीच्या शिक्षकपदी निवडीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला

Uttar Pradesh Viral video : हुंड्याच्या हव्यासापोटी मागितली थेट 'महिंद्रा थार'; वधूच्या कुटुंबीयांनी भरमांडवात दाखवला आरसा!

Uttar Pradesh Viral video: हुंड्याच्या मागणीला उत्तर देण्यासाठी वधूच्या कुटुंबीयांनी अनोखी शक्कल लढवल्याची घटना उत्तर

Solapur Crime News: आईला त्रास देत असल्याच्या रागातून भावानेच भावाचा कुऱ्हाडीने वार करून खून; सोलापुरातील घटना

Solapur Crime News: सोलापूर शहरातील उमा नगरी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास भावानेच भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये 3,028 कोटींचा पॉड टॅक्सी प्रकल्प; हर की पौरी, मनसा देवीसह प्रमुख ठिकाणे जोडणार

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू