मुंबई : आपल्या जादूई आणि सुरांनी कोट्यवधी लोकांच्या मनावर राज्य करणारे लोकप्रिय गायक अरिजीत सिंग (अरिजित सिंह) पुन्हा एकदा एका नव्या संगीत दौऱ्यासाठी (Tour) पूर्णपणे तयार झाले आहेत. आपल्या सांगीतिक प्रवासाची यशस्वी २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ते २०२७ मध्ये भारतातील नऊ वेगवेगळ्या शहरांमध्ये कॉन्सर्ट सादर करणार आहेत. जानेवारी ते मे २०२७ या काळात हा भव्य सोहळा रंगणार असून, आता या कार्यक्रमाची तिकिटे देखील विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. यात विशेष म्हणजे, २० फेब्रुवारी २०२७ रोजी मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्सवर अरजित सिंगचा हा अत्यंत लोकप्रिय लाइव्ह कॉन्सर्ट होणार आहे.
११.८० लाखांचं सर्वात महागडं तिकीट अन् भारी व्हीआयपी सुविधा
या संपूर्ण टूरमध्ये मुंबईतील कॉन्सर्टची तिकिटे सध्या सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरली आहेत, कारण येथील एका सर्वात महागड्या तिकीटाची किंमत चक्क ११ लाख ८० हजार रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. 'द रेसिडेन्स' नावाच्या या खास टेबल पॅकेजमध्ये एकूण १५ जणांसाठी अतिशय विलासी (Ultra-Premium) सोय करण्यात आली आहे. या पॅकेजमध्ये पाहुण्यांसाठी बकण्याची अंशतः व्यवस्था, स्वागतासाठी खास ड्रिंक्स, हवी तशी बॉटल सर्व्हिस, दर्जेदार जेवणाचा बेत, स्वतंत्र स्वच्छतागृहे, येण्या-जाण्यासाठी विशेष मार्ग आणि पार्किंगची सुविधा मिळणार आहे. एवढेच नाही तर, यात खास गिफ्ट्स आणि लॅमिनेटेड पास देखील दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे, या संपूर्ण पॅकेजमध्ये ५ प्रीमियम बॉटल्स, २ लक्झरी बॉटल्स, ३६ बिअर आणि ३६ मिक्सर्सचा देखील समावेश आहे.
कोकण: रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पालशेत गावात शासकीय भूखंडावर चित्रपट निर्मिती आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘फिल्म टूरिझम’ ...
एका तिकिटाच्या पैशात खरेदी करता येतील तीन आयफोन ड्युओ!
एकाच कॉन्सर्टच्या तिकिटाची ही किंमत ऐकून सामान्य माणसाला मोठा धक्का बसू शकतो. जर एका 'आयफोन ड्युओ'ची किंमत २ लाख ९९ हजार ९०० रुपये गृहीत धरली, तर या एका तिकिटाच्या पैशात तुम्ही तब्बल ३ आयफोन ड्युओ सहज विकत घेऊ शकता! अर्थात, हा कॉन्सर्ट सगळ्यांनाच परडावा म्हणून वेगवेगळ्या श्रेणीनुसार तिकिटे ठेवली आहेत आणि ठिकाणानुसार त्यांचे दर बदलतात. स्टँडिंग झोनमधील अगदी साधी सिल्व्हर तिकिटे ३,९९९ रुपयांपासून सुरू होतात. याशिवाय, टप्प्यानुसार सिल्व्हरची तिकिटे ३,९९९ ते ४,९9९ रुपयांपर्यंत, गोल्ड तिकीट ७,४९९ रुपयांना, तर प्लॅटिनम राईट किंवा लेफ्ट तिकीट ९,९९९ ते १७,४९९ रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.
कुठे आणि केव्हा होणार अरजित सिंगचे कॉन्सर्ट्स ?
अरिजीत सिंगच्या या बहुप्रतिक्षित भारतीय संगीत दौऱ्याची सुरुवात ९ जानेवारी रोजी अहमदाबाद शहरातून होणार आहे. त्यानंतर २३ जानेवारीला चंदीगड आणि ७ फेब्रुवारीला जयपूरमध्ये त्यांचे कार्यक्रम पार पडतील. या दौऱ्यांतर्गत २० फेब्रुवारीला मुंबईत, १३ मार्चला बंगळुरूमध्ये आणि २७ मार्चला नवी दिल्लीत ते आपली कला सादर करणार आहेत. काही महिन्यांपूर्वीच, म्हणजेच जानेवारी २०२६ मध्ये त्यांनी पार्श्वगायनातून (Playback Singing) बाजूला होत असल्याची घोषणा करून चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. यामुळे त्यांच्या या लाईव्ह कॉन्सर्टबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि क्रेझ पाहायला मिळत आहे.