1/4
1 तुमच्यासाठी विवाह म्हणजे नेमकं काय? प्रत्येक व्यक्तीची लग्नाबद्दलची कल्पना आणि अपेक्षा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे लग्नाला होकार देण्याआधी भावी जोडीदाराला विवाह म्हणजे काय, पती-पत्नीच्या नात्यात कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात आणि घरातील जबाबदाऱ्या दोघांनी कशा वाटून घ्याव्यात, याबद्दल नक्की विचारा.

2/4
2 तुमचा एक सामान्य दिवस कसा असतो? भावी जोडीदाराच्या दैनंदिन आयुष्याबद्दल जाणून घेतल्याने त्याच्या सवयी, जीवनशैली आणि विचार समजून घेण्यास मदत होते. कामावरून घरी आल्यानंतर तो कसा वेळ घालवतो, कुटुंब आणि मित्रांना किती वेळ देतो, तसेच स्वतःसाठी किती वेळ राखून ठेवतो, हे जाणून घेतल्यास दोघांच्या जीवनशैलीत किती साम्य आहे, हे समजू शकते
3/4
3 लग्नानंतर कुटुंबाचा सहभाग किती असावा? लग्नानंतर पती-पत्नीच्या आयुष्यात दोन्ही कुटुंबांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे भावी जोडीदाराला आई-वडिलांसोबतचे नाते, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि महत्त्वाचे निर्णय घेताना कुटुंबाचा सहभाग किती असावा, याबद्दल विचारा. यामुळे दोघांच्या अपेक्षा आधीच स्पष्ट होतील आणि भविष्यात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता कमी होईल.
4/4
4 लग्नाआधी मोकळेपणाने संवाद साधा! अरेंज मॅरेजमध्ये एकमेकांना जाणून घेण्यासाठी मर्यादित वेळ मिळत असल्याने केवळ नोकरी, पगार आणि शिक्षण यावरच चर्चा करू नका. भावी जोडीदाराचे विचार, अपेक्षा, स्वभाव आणि भविष्याबद्दलची स्वप्ने समजून घेण्याचा प्रयत्न करा. मोकळेपणाने केलेला संवाद नात्यात विश्वास निर्माण करण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी महत्त्वाचा ठरत.