Tuesday, October 13, 2026

सोमेश्वर कारखान्यावर विजय मिळवल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, "विजय म्हणजे दादांनी आजपर्यंत केलेल्या कष्टाचे फळ"

सोमेश्वर कारखान्यावर मिळवलेला हा विजय म्हणजे दादांनी आजपर्यंत केलेल्या कष्टाचे फळ आहे अशा शब्दात आपल्या भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी व्यक्त केल्या.

पुणे: सोमेश्वर कारखान्यावर मिळवलेला हा विजय म्हणजे दादांनी आजपर्यंत केलेल्या कष्टाचे फळ आहे अशा शब्दात आपल्या भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी व्यक्त केल्या. आज जनता दरबारसाठी सुनेत्रा पवार प्रदेश कार्यालयात आल्या असता माध्यमांशी संवाद साधला.

सोमेश्वर कारखान्यावर एकहाती विजय मिळवल्यानंतर सुनेत्रा पवार प्रदेश कार्यालयात आल्या असता त्यांचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी जोरदार स्वागत केले. त्यानंतर दादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, मंत्री, आमदार उपस्थित होते. माझ्या शेतकऱ्यांच्या शेतपिकाला चांगला भाव मिळाला पाहिजे. शेवटचा शेतकरी कसा सुखी झाला पाहिजे अशी भावना दादांची असायची हेही आवर्जून सुनेत्रा पवार सांगितले.

?feature=share  

दादांनी 35 वर्षे या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यासाठी कष्ट घेतलेले होते. यावर्षी देशातील उच्चांक भाव सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने दिला आहे. म्हणून इथला शेतकरी सुखावह झाला होता. दादांनी आजपर्यंत केलेल्या कामांचे इथल्या शेतकरी राजाने दिलेले हे यश आहे असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या. यावेळी चुरशीची लढत होती परंतु शेतकरी राजाला माहित होतं की नेमकं काय करायचं आहे. आज दादा नसले तरी त्यांनी हा विश्वास माझ्यावर दाखवला. त्याबद्दल सुनेत्रा पवार यांनी आभार मानतानाच हा विश्वास म्हणजे फार मोठी जबाबदारी माझ्यावर आहे याची जाणीव असल्याचे स्पष्ट केले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी आमचा या गोष्टीवर जास्त भर आहे असेही दुष्काळावर बोलताना सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >