Tuesday, October 13, 2026

Cholesterol CANTROL: कोलेस्टेरॉलवर नियंत्रण मिळवायचं आहे का तर ही 5 फळे आपल्या आहारात नक्की समाविष्ट करा

कोलेस्टेरॉलवर नियंत्रण

आजच्या धावपळीच्या जीवनात चुकीच्या आहाराच्या सवयी आणि शारीरिक हालचालींमुळे कोलेस्टेरॉलची समस्या वाढताना दिसत आहे. शरीरातील खराब कोलेस्टेरॉल म्हणजेच LDL चे प्रमाण वाढले की हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. त्यामुळे आहार आणि नियमित व्यायाम रोजचा जीवनात महत्वाचा आहे. 1/6 आजककालची जीवनशैली, अयोग्य आहार आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे कोलेस्ट्रॉलची समस्या खूप वाढत आहे. शरीरातील 'वाईट' कोलेस्ट्रॉल (LDL) ची पातळी वाढलयास रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचा थर साचण्याचा धोका निर्माण होतो, ज्यामुळे हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. तसेच, मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. रक्ताच्या गुठळ्या झाल्यास स्ट्रोकचा धोका अधिकच वाढतो. कोलेस्टेरॉच्या नियंत्रणासाठी उपयुक्त ५ फळे 1. सफरचंद : सफरचंदामध्ये पेक्टिन नावाचे विद्राव्य तंतू असतात. ते शरीरातील कोलेस्टेरॉलचे शोषण कमी करण्यास मदत करू शकतात. 2/6 2. संत्रे : संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर असते. त्यामुळे पचनक्रिया आणि एकूण आरोग्य चांगले राखण्यास मदत होते. 3/6 3. नाशपाती : नाशपातीमध्ये विद्राव्य आणि अविद्राव्य असे दोन्ही प्रकारचे फायबर असतात. विद्राव्य फायबर कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. 4/6 4. अ‍ॅव्होकॅडो : या फळामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात. संतृप्त चरबीयुक्त पदार्थांच्या जागी अ‍ॅव्होकॅडोचा समावेश केल्यास खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत होऊ शकते. 5/6 5. जांभूळ : जांभळामध्ये फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. संतुलित आहाराचा भाग म्हणून हे फळ आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. 6/6    
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >