Nashik TCS Case : टीसीएस धर्मांतर प्रकरणातील खटले आता एकाच न्यायालयात, पुढील सुनावणी 19 ऑक्टोबरला

नऊपैकी सहा खटल्यांमध्ये दोषनिश्चितीपूर्वीचा युक्तिवाद सुरू झाला आहे. सर्व संबंधित खटल्यांची सुनावणी एकाच न्यायालयात झाल्याने न्यायालयीन प्रक्रियेला समन्वित स्वरूप मिळणार आहे.

Nashik TCS Case : नाशिकच्या बहुचर्चित टीसीएस कंपनीतील तरुणींचा विनयभंग, बलात्कार आणि धर्मांतराच्या प्रयत्नांशी संबंधित प्रकरणातील सुनावणी एकाच न्यायालयात व्हावी, यासाठी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातील खटला नाशिकरोड सत्र न्यायालयातून नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला आहे. प्रधान मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला असून, संबंधित इतर खटल्यांसोबत या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी १९ ऑक्टोबर रोजी होणार आहे.



व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून कट रचल्याचा संशय


प्रधान मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आल्यावर, या प्रकरणाशी संबंधित इतर खटल्यांसोबतच नाशिक सत्र न्यायालयात एकत्रित सुनावणी सुरू झाली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीच्या हाती संवेदनशील पुरावे लागले आहेत. संशयितांनी विशेष व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करून त्याद्वारे कट रचल्याचे तपासात उघड झाल्याचे वृत्त आहे.


तरुणींना या जाळ्यात ओढून एका तरुणीवर बलात्कार, अन्य तरुणींचा विनयभंग तसेच एका तरुणाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप या प्रकरणात आहेत. एसआयटीने तपासादरम्यान गोळा केलेले पुरावे न्यायालयासमोर सादर केले आहेत. देवळाली कॅम्प येथील गुन्ह्यातील संशयितांची उपस्थिती नोंदवण्यात आल्यानंतर न्यायालयातील युक्तिवादाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता या प्रकरणाकडे १९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीकडे लक्ष लागले आहे.




नऊ गुन्हे दाखल; सहा खटल्यांत युक्तिवाद सुरू


मार्च महिन्यात हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर देवळाली कॅम्प आणि मुंबई नाका पोलीस ठाण्यांमध्ये एकूण नऊ गुन्हे दाखल करण्यात आले. या गुन्ह्यांमध्ये विनयभंग, धार्मिक भावना दुखावणे आणि तरुणींसह एका तरुणाच्या धर्मांतराच्या कथित प्रयत्नांसारख्या आरोपांचा समावेश आहे. पोलीस तपासानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. उपलब्ध माहितीनुसार, नऊपैकी सहा खटल्यांमध्ये दोषनिश्चितीपूर्वीचा युक्तिवाद सुरू झाला आहे. सर्व संबंधित खटल्यांची सुनावणी एकाच न्यायालयात झाल्याने न्यायालयीन प्रक्रियेला समन्वित स्वरूप मिळणार आहे.



प्रकरणातील दहा प्रमुख संशयित


या प्रकरणाशी संबंधित प्रमुख संशयितांची नावे पुढीलप्रमाणे आहेत : १. दानिश शेख, २. तौसिफ अत्तार, ३. निदा खान, ४. मतीन पटेल (नगरसेवक, एमआयएम छत्रपती संभाजीनगर), ५. अश्विनी चैनानी (असिस्टंट जनरल मॅनेजर, टीसीएस), ६. रझा मेमन, ७. शाहरुख कुरेशी, ८. आसिफ अन्सारी, ९. शफी शेख, १०. हानिफ शेख (निदा खान पसार असताना आश्रय देणारा घरमालक)

Comments
Add Comment

UPI MDR Charge Update : UPI युजर्ससाठी मोठी बातमी; मर्चेंट पेमेंटवर MDR लागू करण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर, लवकरच जाहीर होणार नवी तारीख

नवी दिल्ली : सध्या सणासुदीचा काळ सुरू असताना, यूपीआय (UPI) द्वारे डिजिटल व्यवहार करणाऱ्या ग्राहकांसाठी आणि

जिद्द, चिकाटी आणि रूढीवादी समजुती मोडून काढणारी एक प्रभावी कथा! सुमो दीदीचा ट्रेलर प्रदर्शित !

भारताची पहिली व्यावसायिक महिला सुमो कुस्तीपटू हेतल दवे यांच्या उल्लेखनीय प्रवासावर आधारित 'सुमो दीदी' या

Raigad Shed Collapse : रायगडमध्ये मोठी दुर्घटना : खालापूरजवळ लॉजिस्टिक वेअरहाऊसचे शेड कोसळले; २० ते २५ कामगार अडकल्याची किंवा जखमी झाल्याची भीती

रायगड : रायगड जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी वृत्त समोर आले आहे. रायगडमधील खालापूर तालुक्यातील

IND vs WI: फक्त 25 धावा करताच अभिषेक शर्माच्या शिरपेचात खोवला जाणार मानाचा तुरा, असं करणारा दुसरा भारतीय ठरणार

[caption id="attachment_1065948" align="aligncenter" width="800"] वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या टी20 सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. भारताने या

Old Monk Ban in Maharashtra : महाराष्ट्रात 'ओल्ड मंक' दारू विक्री बंदीचा वाद तापला; कंपनीला ५०० कोटींचा फटका, तर सरकारचेही ३५० कोटी बुडाले!

मुंबई : देशभरात आणि तरुणाईमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेला 'ओल्ड मंक' (Old Monk) हा रमचा ब्रँड सध्या एका मोठ्या कायदेशीर आणि

Nashik Crime : त्र्यंबकनाका सिग्नलवर तरुणावर दगडाने हल्ला; गुंडाविरोधी पथकाची तत्पर कारवाई, दोघे ताब्यात

Nashik Crime : नाशिक शहरातील त्र्यंबकनाका सिग्नल परिसरात एका तरुणाला दगडाने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न