Eknath Shinde : दिल्लीतील मोर्चामागे परकीय शक्तींचा हात - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आरोप

लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार असला, तरी न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी मोर्चा काढण्याची पद्धत योग्य आहे का, असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला.

राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर निशाणा


मुंबई : दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने काढण्यात आलेल्या मोर्चावर टीका करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आंदोलनामागे परकीय शक्ती आणि आंतरराष्ट्रीय कटकारस्थान असण्याची शंका व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत त्यांनी राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा निषेध केला. लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार असला, तरी न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी मोर्चा काढण्याची पद्धत योग्य आहे का, असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला. (Delhi Protest)


दिल्लीतील मोर्चाबाबत प्रतिक्रिया देताना शिंदे यांनी हा दिवस देशाच्या इतिहासातील ‘काळा दिवस’ असल्याचे म्हटले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानातून उभ्या राहिलेल्या घटनात्मक संस्थांवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला. भारताच्या न्यायव्यवस्थेवर हा हल्ला असल्याचे सांगत, संबंधितांनी देशाची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली. (Eknath Shinde)



विरोधकांकडून संविधान नष्ट करण्याचा आणि लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. देशाला अराजकतेकडे नेण्याचे काम सुरू आहे. हे देशासाठी घातक आहे. निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विजय मिळवता येत नसल्यामुळे विरोधक अशा प्रकारची आंदोलने करत आहेत. या आंदोलनात परकीय शक्तींचा सहभाग असल्याचा आरोप करताना, देशाला अस्थिर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर कटकारस्थान रचले जात असल्याची शंका शिंदे यांनी व्यक्त केली.

Comments
Add Comment

Old Monk Ban in Maharashtra : महाराष्ट्रात 'ओल्ड मंक' दारू विक्री बंदीचा वाद तापला; कंपनीला ५०० कोटींचा फटका, तर सरकारचेही ३५० कोटी बुडाले!

मुंबई : देशभरात आणि तरुणाईमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेला 'ओल्ड मंक' (Old Monk) हा रमचा ब्रँड सध्या एका मोठ्या कायदेशीर आणि

Nashik Crime : त्र्यंबकनाका सिग्नलवर तरुणावर दगडाने हल्ला; गुंडाविरोधी पथकाची तत्पर कारवाई, दोघे ताब्यात

Nashik Crime : नाशिक शहरातील त्र्यंबकनाका सिग्नल परिसरात एका तरुणाला दगडाने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न

Vijay-Rashmika at Tirupati : तिरुपती मंदिरात रश्मिका-विजयला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी; 'रणबाली'च्या रिलीजपूर्वी दोघांनी घेतले व्यंकटेश्र्वरांचे दर्शन

तिरुपती : साऊथ इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) आणि विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) यांनी मंगळवारी पहाटे

Vijay setupati: विजय सेतुपती यांचा "ट्रेन" चित्रपट कधी होणार रिलीज?

अभिनेता विजय सेतुपती पुन्हा एकदा थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. नुकताच प्रदर्शित झालेला

शुभमन गिलचा पाचव्यांदा आयसीसी पुरस्काराने गौरव, तर शफाली वर्माला मिळाला सन्मान; जाणून घ्या कोण होतं शर्यतीत

[caption id="attachment_1065924" align="aligncenter" width="800"] आयसीसी पुरस्करांची घोषणा झाली असून सप्टेंबर महिन्यात केलेल्या कामगिरीचा आढावा

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांची शिष्टाई यशस्वी, नागपूर भाजपातील बंड शमले

- बंडखोर अनिल सोलेंची माघार; गिरीश व्यास यांचाही राजीनामा मागे मुंबई : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या