आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय पुरुष हॉकी संघाची घोषणा; हरमनप्रीत सिंगकडे कर्णधारपद!

Indian Mens Hockey Team Announced: हॉकी इंडियाने 'आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी पंजाब 2026' साठी भारतीय पुरुष हॉकी संघाची अधिकृत घोषणा केली आहे. पंजाबमधील जालंधर आणि मोहाली येथे ही स्पर्धा रंगणार आहे.

नवी दिल्ली: हॉकी इंडियाने 'आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी पंजाब 2026' साठी भारतीय पुरुष हॉकी संघाची अधिकृत घोषणा केली आहे. आगामी 27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान पंजाबमधील जालंधर आणि मोहाली येथे ही स्पर्धा रंगणार आहे. जपानमधील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवून देत विजेतेपद यशस्वीपणे राखणाऱ्या मुख्य संघावरच निवड समितीने पुन्हा एकदा विश्वास दाखवला असून, संघाचे नेतृत्व स्टार drag-flicker हरमनप्रीत सिंग याच्याकडेच सोपवण्यात आले आहे.







संघामध्ये सातत्य आणि युवा खेळाडूंना संधी


मायदेशात आशियातील आघाडीच्या हॉकी संघांशी सामना करण्यासाठी संघात मोठे बदल न करता सातत्य राखण्यावर भर देण्यात आला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत यश मिळवून देणारा बहुतांश संघ कायम ठेवण्यात आला आहे. गोलकीपर कृष्ण बहादूर ठाकूर याचे संघात दमदार पुनरागमन झाले आहे, तर युवा डिफेंडर अमनदीप लाक्रा आणि मिडफिल्डर आदित्य अर्जुन लालागे यांना वरिष्ठ संघात स्वतःचे स्थान बळकट करण्याची आणखी एक सुवर्णसंधी मिळाली आहे. याशिवाय, 18 सदस्यांच्या मुख्य संघाव्यतिरिक्त मिडफिल्डर विष्णू कांत सिंग आणि फॉरवर्ड अंगद बीर सिंग यांना राखीव खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले आहे.







मुख्य प्रशिक्षकाची प्रतिक्रिया


भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांनी आनंद व्यक्त करत म्हणाले की, "पंजाबमध्ये आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणे ही अत्यंत विशेष बाब असेल. या संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा सुरेख संगम पाहायला मिळतो. मायदेशातील प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या ऊर्जेचा आणि पाठिंब्याचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. भारतात स्पर्धा खेळण्यासारखा दुसरा आनंद नाही आणि या वातावरणाची आम्हाला नक्कीच उणीव भासत होती."







पंजाबमध्ये आंतरराष्ट्रीय हॉकीचे पुनरागमन


ही स्पर्धा भारतीय हॉकीसाठी विशेष महत्त्वाची ठरत आहे, कारण याद्वारे पंजाबमध्ये आंतरराष्ट्रीय हॉकीचे शानदार पुनरागमन होत आहे. पंजाबने भारतीय हॉकीला मोठे योगदान दिले असून अनेक पिढ्यांचे दिग्गज खेळाडू या राज्याने देशाला दिले आहेत. जालंधरच्या सुरजीत हॉकी स्टेडियमवर साखळी सामने तर मोहालीच्या आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमवर उपांत्य आणि अंतिम सामने पार पडणार आहेत. या उच्चस्तरीय सामन्यांमुळे हॉकीचेखोलवर नाते असलेल्या या प्रदेशातील क्रीडाप्रेमींना आशियातील सर्वोत्तम हॉकीपटूंचा खेळ जवळून अनुभवता येईल.

Comments
Add Comment

India vs New Zealand Test : टीम इंडियाला मोठा धक्का ! आकाशदीप दुसऱ्या कसोटीतून बाहेर, प्रसिद्ध कृष्णाला मिळाली संधी

India vs New Zealand Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज

Ind Vs Nz: भारताचा दुसऱ्या कसोटीचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला, ध्रुव जुरेलची झुंजार खेळी

मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्चच्या हॅगले ओव्हल मैदानात सुरू आहे. या सामन्यात

न्यूझीलंडसमोर टीम इंडियाची घसरगुंडी! 240 धावांची अजूनही पिछाडी

क्राइस्टचर्च : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी दुसऱ्या दिवशी

आकाशदीपचा क्राइस्टचर्चमध्ये 'पंजा'; न्यूझीलंडचा पहिला डाव 356 धावांत आटोपला, ब्लंडेलचे शतक हुकले...

मुंबई: क्राईस्टचर्चमधील हेगले ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी

'हिटमॅन'चा नंबर गेम! संध्याकाळी 17:45 वाजताच मुंबई इंडियन्सने का केली रोहित शर्माच्या नावाची घोषणा? जाणून घ्या

मुंबई इंडियन्स आयपीएल 2027 स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. मिनी लिलावापूर्वी नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. हा

Rohit Sharma : 'चला, सगळ्यांनी छान हसा..', मुंबई इंडियन्सचा कर्णधार होतात रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया Video

IPL 2027 Mumbai Indians Captain Name : रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी विराजमान झाला आहे. मागच्या तीन पर्वात