Tuesday, October 13, 2026

Isha ambani: ईशा अंबानी यांचा लूकने वेधलं सगळ्यांचे लक्ष

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी आपलया अनोख्या फॅशन स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते.

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी आपलया अनोख्या फॅशन स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. यंदाच्या नवरात्रीत त्यांनी परिधान केलेलया खास लेहेंग्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पारंपरिक भारतीय कलांचा सुंदर संगम असलेलया या लेहेंग्याची सध्या फॅशनविश्वात चर्चा सुरू आहे. 1/3 लेहेंग्याचे वैशिष्ट्य काय?
ईशा अंबानी यांनी प्रसिद्ध डिझायनर करण तोरानी यांच्या तोरानी ब्रँडने स्वदेश सोबत तयार केलेला खास लेहेंगा परिधान केला होता. या लेहेंग्याचा मूळ रंग आयव्हरी म्हणजेच फिकट क्रीम आहे. त्यावर राधा-कृष्ण यांच्या रासलीलेची सुंदर चित्रे रंगवण्यात आली आहेत. या पोशाखामध्ये आंध्र प्रदेशातील कलमकारी आणि ओडिशातील पट्टचित्र या पारंपरिक कलांचा वापर करण्यात आला आहे. रंगीत चित्रांसोबतच लेहेंग्यावर झरदोजी भरतकाम, मोती, आरसे आणि इतर नाजूक कलाकुसर करण्यात आली आहे. 2/3 १० कारागिरांची २,००० तासांची मेहनत
या खास लेहेंग्याचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यासाठी करण्यात आलेली मेहनत. हा पोशाख तयार करण्यासाठी १० कारागिरांनी ९० दिवसांहून अधिक काळ काम केले. चित्रकला आणि कलाकुसरीसाठी एकूण २,००० तासांहून अधिक वेळ लागला. त्यामुळे हा पोशाख केवळ फॅशनपुरता मर्यादित न राहता पारंपरिक भारतीय हस्तकलेचे उदाहरण ठरला आहे. 3/3 आईच्या दागिन्यांनी केलेला लूक चर्चेत
ईशा यांनी या लेहेंग्यासोबत त्यांच्या आई नीता अंबानी यांच्या वैयक्तिक संग्रहातील दागिने परिधान केले होते. आकर्षक नेकलेस, मोराच्या डिझाइनचे कानातले आणि हातातील दागिन्यांमुळे त्यांच्या पारंपरिक लूकला शाही स्वरूप मिळाले. त्यांच्या हेअर अ‍ॅक्सेसरीजनेही लक्ष वेधून घेतले.    
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >