टॉलीवुड सुपरस्टार रजनीकांत यांच्या प्रदर्शित होणाऱ्या ‘जेलर 2’ या चित्रपटाची सध्या फ्यान्स विश्वात जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपट प्रदर्शित ...
जटायूच्या पोस्टरने वेधून घेतले चाहत्यांचे लक्ष
‘रामायण’ चित्रपटातील जटायूचे पोस्टर १३ ऑक्टोबर २०२६ ला समोर आले. या पोस्टरमध्ये जटायूचे प्रभावी रूप आणि त्याचे विशाल पंख पाहायला मिळले. या पात्राला ‘द विंग्स ऑफ धर्मा’ अर्थात ‘धर्माचे पंख’ असा अर्थ देण्यात आला आहे. जटायूचे धैर्य, सत्यासाठी लढण्याची वृत्ती आणि धर्माप्रती असलेली निष्ठा या पोस्टरमधून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.(JATAYU)
अभिनेता विजय सेतुपती पुन्हा एकदा थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. नुकताच प्रदर्शित झालेला बाथा या चित्रपटाला प्रेक्षकांकडून ...
अनुपम खेर यांच्या आवाजातून जिवंत होणार जटायू
या चित्रपटात जटायूच्या पात्राला अभिनेते अनुपम खेर यांचा आवाज देण्यात आला आहे. आपल्या दमदार अभिनयासाठी आणि प्रभावी आवाजासाठी ओळखले जाणारे अनुपम खेर या पात्राला कशा प्रकारे सादर करतात, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. जटायूच्या व्यक्तिरेखेमुळे चित्रपटातील भावनिक आणि साहसी प्रसंगांना विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे.(RAMAYAN)
मुंबई : रामायण चित्रपटात रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. रामायण चित्रपट हा 40 भाषांमध्ये प्रदर्शित होत असून या ...
रामायणातील जटायूचे महत्त्व काय?
रामायणात जटायू हा एक शूर पक्षिराज म्हणून ओळखला जातो. रावणाने माता सीतेचे अपहरण केलयानंतर जटायू तिला वाचवण्यासाठी रावणाशी लढतो. रावण अधिक शक्तिशाली असलयाची जाणीव असूनही जटायू सीतेच्या रक्षणासाठी धैर्याने त्याचा सामना करतो. जटायूची ही कथा केवळ शौर्याची नसून, अन्यायाविरुद्ध लढा देण्याची, कर्तव्यनिष्ठेची आणि दुसऱ्याच्या रक्षणासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा देणारी आहे. त्यामुळे ‘रामायण’मधील जटायूचे पात्र कथेचा दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. यामुळे चाहते चित्रपट पाहण्यास उत्सूक आहेत.