उद्योगांच्या गुंतवणूक परिसंस्था निर्मितीत महाराष्ट्र सर्वात आघाडीवर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : कौशल्य, भांडवल आणि तंत्रज्ञानाची सांगड घालणाऱ्या गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रात उत्कृष्ट परिसंस्था कार्यरत आहे. सर्वच क्षेत्रातील उद्योगांच्या गुंतवणुकीसाठी असलेल्या परिसंस्थेच्या निर्मितीत महाराष्ट्र हा सर्वात आघाडीवर आहे, अशा शब्दात महाराष्ट्राचे महत्व अधोरेखित करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युनायटेड किंगडममधील संस्था आणि उद्योजकांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. गुंतवणूकदारांचे प्रकल्प वेगाने पुढे नेण्यासाठी ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ व्यासपीठाच्या माध्यमातून सर्व संबंधित यंत्रणांशी तातडीने समन्वय साधला जाईल. यूके मधील सचिव, महापौर व अधिकारी यांचा हा दौरा केवळ औपचारिक भेट नसून दोन्ही देशांमधील महत्वाकांक्षेचे प्रत्यक्ष व्यवसाय आणि करारांमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

हॉटेल ताज पॅलेस येथे आयोजित महाराष्ट्र-यूके भागीदारी शुभारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अनबळगण, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, युनायटेड किंगडमचे व्यवसाय, नवोन्मेष, विज्ञान आणि व्यापार राज्य सचिव जोनाथन रेनॉल्ड्स उपस्थित होते. यूकेच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळासोबत झालेल्या द्विपक्षीय चर्चांनंतर विविध महत्वाच्या क्षेत्रांतील सहकार्य वाढविण्यासाठी महाराष्ट्र आणि यूके दरम्यान झालेल्या सामंजस्य कराराचे आदान प्रदान करण्यात आले.


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबई आंतरराष्ट्रीय वित्त, व्यापार आणि उद्योजकतेला जागतिक बाजारपेठांशी थेट जोडते. पुणे हे अभियांत्रिकी, वाहन उद्योग, उत्पादन आणि माहिती तंत्रज्ञानाचे प्रमुख केंद्र बनले आहे. राज्यभरातील कुशल मनुष्यबळ, सक्षम औद्योगिक समूह आणि जागतिक ग्राहकांना सेवा देणाऱ्या अनुभवी भागीदारांचे मजबूत जाळे ही महाराष्ट्राची ताकद आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे परदेशी विद्यापीठांना महाराष्ट्रात कॅम्पस सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. ‘युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल’, ‘युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क’ आणि ‘युनिव्हर्सिटी ऑफ ॲबर्डिन’ यासारखी जागतिक विद्यापीठे महाराष्ट्रात येत आहेत. राज्यात उभारण्यात येणाऱ्या एज्युसिटी, मेडिसिटी आणि एआय इनोव्हेशन सिटीमुळे जागतिक दर्जाचे संशोधन, संस्था आणि प्रतिभा एकत्र येतील.



महाराष्ट्रात औद्योगिक कार्बन उत्सर्जन कमी करणे, ऊर्जा कार्यक्षमता, पाणी व्यवस्थापन, वाहतूक आणि साधनसंपत्तीचे पुनर्नवीकरण यासारख्या स्वच्छ ऊर्जा प्रकल्पांना मोठा वाव आहे. जागतिक कंपन्यांना त्यांची ‘ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स’ आणि तंत्रज्ञान संशोधन केंद्रे महाराष्ट्रात उभारण्यासाठी राज्य शासन पूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या भागीदारीमुळे महाराष्ट्रातील स्थानिक उत्पादक, अन्नप्रक्रिया उद्योग, तंत्रज्ञान कंपन्या आणि लघुउद्योजकांना ब्रिटनमध्ये नव्या बाजारपेठा व ग्राहक मिळविण्याची संधी उपलब्ध होईल. येत्या काळात महाराष्ट्र आणि ब्रिटनमधील संबंध करारांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष उद्योग, व्यवसाय आणि रोजगारनिर्मितीतून अधिक दृढ होतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.


राज्य सचिव जोनाथन रेनॉल्ड्स म्हणाले, यूकेच्या ज्या कंपन्या भारतीय बाजारपेठेत प्रवेश करू इच्छितात, त्यांच्यासाठी महाराष्ट्र हे सर्वात नैसर्गिक आणि योग्य ठिकाण आहे. या राज्याची निवड त्याच्या स्पष्ट आर्थिक ताकदीमुळे, राजकीय स्थैर्य आणि नेतृत्वामुळे केली आहे. राज्याची अर्थव्यवस्था ही युरोपमधील नॉर्वे देशापेक्षाही मोठी आहे. महाराष्ट्रात केवळ एका कागदावर स्वाक्षरी करण्यासाठी आलेलो नाही, तर आम्हाला प्रत्यक्ष परिणाम आणि यश हवे आहे. दोन्ही बाजूंच्या लोकांनी एकत्र येऊन हे काम पुढे न्यावे आणि दोन्ही देशांच्या प्रगतीला गती द्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी यूकेमधील स्कॉटलंडचे पर्यावरण, अन्न आणि ग्रामीण व्यवहार सचिव डेम अँज्युला ईगल, राज्य सचिव डग्लस अलेक्झांडर, ईयू आणि आंतरराष्ट्रीय व्यापारचे संचालक सोफी ब्राईस, दक्षिण आशियासाठी यूकेचे उप-व्यापार आयुक्त हरशबीर संघा, इंग्लंडचे दक्षिण आशियासाठी व्यापार आयुक्त आणि पश्चिम भारतासाठी ब्रिटनचे उप-उच्चायुक्त हरजिंदर कांग, महापौर आदी उपस्थित होते.a

Comments
Add Comment

सांताक्रूझ स्कायवॉकला छत बसवण्याचा प्रस्ताव अद्यापही रखडलेला, BMC स्थायी समितीच्या मंजुरीकडे लक्ष

मुंबई: सांताक्रूझ पूर्वेकडील स्टेशन लगत असणाऱ्या स्कायवॉकचं छत बसवण्यासाठी निविदा काढून अनेक महिने उलटले आहेत.

कचऱ्यापासून 'कॉम्प्रेस्ड बायोगॅस' निर्मितीसाठी टास्क फोर्स स्थापन करा! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील शहरांना कचरामुक्त करण्यासोबतच कचऱ्यापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) निर्मितीला चालना

शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीसाठी तगादा लावल्यास कारवाई, मायक्रो फायनान्स कंपन्यांना महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा

मुंबई: शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीसाठी तगादा लावणाऱ्या बँका, मायक्रो फायनान्स कंपन्या आणि अवैध सावकारांविरोधात

Malad Accident : मुंबईत भीषण अपघात : मालाडमध्ये रिक्षा आणि बाईकच्या धडकेनंतर बसखाली आल्याने ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील मालाड पश्चिम (Malad West) येथील मार्वे रोडवर एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघात घडला आहे. एका भरधाव

Nana Patekar : ‘आठवणीतले नाना’ कार्यक्रमातून ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या स्मृतींना उजाळा

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या कलाप्रवासाची आठवण जागवण्यासाठी मुंबईत ‘आठवणीतले नाना’ या विशेष

Mumbai Water Supply : पिण्याच्या पाण्याचा गैरवापर केल्यास होणार कारवाई, महापालिका प्रशासनाने दिला कारवाईचा इशारा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा कोणत्याही ठिकाणी