BMC : महापालिका मुख्यालयासमोर उभारणार 75 फूट उंचीवर कायमस्वरूपी राष्ट्रध्वज

सभागृह नेते गणेश खणकर यांची आयुक्तांकडे मागणी

मुंबई (विशेष् प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या ऐतिहासिक मुख्यालयासमोर ७५ फूट उंचीवर भव्य राष्ट्रध्वज कायमस्वरूपी उभारण्यात यावा, अशी मागणी मुंबई महापालिकेचे सभागृह नेते गणेश खणकर यांनी महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.आशिया खंडातील सर्वात मोठ्या महापालिकेच्या मुख्यालयासमोर डौलाने फडकणारा तिरंगा हा प्रत्येक मुंबईकरासाठी राष्ट्रीय अभिमानाचा विषय ठरेल असे या पत्रात नमुद केले आहे.


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात दररोज हजारो देशी-विदेशी पर्यटक या ऐतिहासिक वास्तूला भेट देतात. अशा ठिकाणी भव्य राष्ट्रध्वज उभारल्यास मुख्यालयाच्या सौंदर्यात आणि वास्तूच्या गौरवात भर पडेल. तसेच हे ठिकाण पर्यटकांसाठी एक आकर्षणाचे केंद्र आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक बनेल. हेरिटेज वास्तूशी संबंधित सर्व नियम, निकष आणि भारतीय ध्वज संहितेचे काटेकोर पालन करून महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात किंवा समोरील योग्य जागेवर ७५ फूट उंचीचा राष्ट्रध्वज कायमस्वरूपी उभारण्याबाबत महापालिका प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी सभागृह नेते गणेश खणकर यांनी केली आहे.






मुंबई महापालिका मुख्यालय ही केवळ प्रशासकीय इमारत नसून मुंबईची ऐतिहासिक ओळख असलेली आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा वास्तूंच्या यादीतील एक महत्त्वपूर्ण वास्तू आहे. आशिया खंडातील सर्वात मोठ्या महापालिकेच्या मुख्यालयासमोर डौलाने फडकणारा तिरंगा हा प्रत्येक मुंबईकरासाठी राष्ट्रीय अभिमानाचा विषय ठरेल. तसेच महापालिकेत येणारे नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ होईल, असे खणकर यांनी पत्रात नमूद केले आहे.

Comments
Add Comment

धारावी विकास प्रकल्पात 210 झाडे बाधित, 67 झाडे कापली जाणार, 143 झाडं पुनर्रोपित करणार; वृक्ष प्राधिकरणाने दिली मंजुरी

मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्पामधील धारावीमधील दोन ठिकाणच्या बांधकामांमधील बाधित झाडांचे प्रस्ताव

BMC : महापालिकेचे नगरसेवक निघणार बीडच्या जंगल सफारीवर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) BMC : उबाठाच्या पक्षतोड, वृक्षतोडच्या आरोपांचा समाचार सभागृहनेते गणेश खणकर यांनी घेत मध्य

गोरेगावमधील कृष्णवाटिका रोड, साई मार्ग ना फेरीवाला क्षेत्र? स्थायी समिती अध्यक्षांनी तातडीने सातत्यपूर्ण कारवाई करण्याचे दिले आदेश

गोरेगाव पूर्व येथील साई मार्ग आणि कृष्णवाटिका मार्गाच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरु आहे, त्यामुळे आधीच

दादर व चेंबूर येथील जलतरण तलावांची महिला - बालकल्याण समिती अध्यक्षांची अचानक पाहणी

दादर (पश्चिम) आणि चेंबूर येथील महानगरपालिका जलतरण तलावांना बुधवारी २५ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबई

Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकावरील धक्कादायक घटना, 60 वर्षीय महिलेला गर्दुल्यांने मारहाण करत अत्याचार

मुंबई: राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत महिलांच्या सुरक्षेचे धिंडवडे निघत असल्याचे पुन्हा एकदा समोर

Bandra Station: वांद्रे स्थानकाला 162 वर्षे पूर्ण; तीन दिवसीय ‘बांद्रा स्टेशन महोत्सव 2026’ ला उत्साहात सुरुवात

Bandra Station: मुंबईच्या ऐतिहासिक वांद्रे रेल्वे स्टेशनने १६२ वर्षांचा टप्पा गाठला आहे. या निमित्ताने पश्चिम