झोपड्यांमधील शौचालयांवरील दुरुस्तीसाठी लाखोंचा खर्च

मुंबई महापालिकेकडून झोपडपट्टीतील एकेका शौचकुपाच्या दुरुस्तीवर तब्बल 1 ते 3 लाख रुपये खर्च केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी स्थायी समितीत उघडकीस आणला. नियमांचे उल्लंघन करून निधीचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत त्यांनी या खर्चात पारदर्शकता आणण्याची आणि पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.

मुंबई (विशेष प्रतिनिधी): आशियातील सर्वांत श्रीमंत महापालिका म्हणून मुंबई महापालिकेचा उल्लेख केला जात असून या महापालिकेच्यावतीने झोपडपट्टीतील शौचालयांच्या दुरुस्तींवर चक्क लाखो रुपयांचा खर्च केला जातो. एकेका शौचकुपांच्या दुरुस्तीवर किमान एक लाख ते तीन लाखांपर्यंत खर्च केला जात असल्याचा धक्कादायक माहितीच मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी स्थायी समितीत मांडून झोपडीधारकांचे शौचालयांच्या दुरुस्तीवर लाखोंचा खर्च केला जात असल्याने अशाप्रकारच्या कामांवर विश्वासच बसत नाही. त्यामुळे अशा कामांच्या खर्चाबाबत पुनर्विचार व्हायला हवा अशी मागणी त्यांनी केली.


मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या पटलावर एच पश्चिम विभागातील विविध विकासकामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. यावर बोलतांना मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी यापूर्वी एन विभागात विविध कामांसाठी स्वतंत्र निविदा मागवताना एकच कंपनी प्रत्येक ठिकाणी पात्र ठरली होती आणि त्यांना सर्व कामे मिळून 3.67 कोटींची कामे तुकड्या तुकडयांमध्ये दिली गेली होती. तसाच हाही प्रस्ताव असून याठिकाणीही जीर्ण पायवाटा यांच्यासाठी 1.96 कोटी रुपये तर इतर कामे तब्बल 2.52 कोटींची अशाप्रकारे एकूण 4.40 कोटी रुपयांची कामे आहेत.


यामध्ये महापालिका अधिनियम 72 (3)च्या नियमांचे उल्लंघन करून तुकडया तुकडयांमध्ये निधी खर्च केला आहे. लिसांकरता वॉच टॉवर उभारला, पण यासाठीचा खर्च किती तर 7 लाख 02 हजार रुपये खर्च केला आहे. तर यामध्ये दहा आसनी शौचालयाच्या दुरुस्तीसाठी 11 लाख 07 हजार रुपये. म्हणजे प्रति शौचकूपाच्या दुरुस्तीवर तब्बल एक लाखांहून अधिक खर्च केला गेला आहे. एक लाखांचा एक संडास बांधला गेला. म्हणजेच झोपडीतील माणूस ज्या शौचालयाचा वापर करतात त्यावर लाखो रुपयांचा खर्च हा केवळ दुरुस्तीसाठी केला आहे.


तसेच चार आसनी शौचालयांच्या दुरुस्तीसाठी आतापर्यंत तब्बल 11 लाख 89 हजार रुपये आणि आणखी एका 4 आसनी शौचालय दुरुस्तीसाठी 9 लाख 57 हजार रुपये. म्हणजे पहिल्या प्रकरणांत एका शौचकुपाच्या दुरुस्तीसाठी सरासरी एक लाखांहून अधिकचा खर्च होता, तर या प्रकरणांमध्ये सुमारे 3 लाख आणि 2 लाख रुपये एवढा खर्च येत आहे. म्हणजे एक शौचकुपांवरील दुरुस्तीसाठी लाखांच्या घरात खर्च हे अनाकलनीय आहे. त्यामुळे कुठेतरी या खर्चांमध्ये पादर्शकता येणे आवश्यक असल्याचे मला वाटते असा सवाल त्यांनी केला.

Comments
Add Comment

BMC : महापालिका मुख्यालयासमोर उभारणार 75 फूट उंचीवर कायमस्वरूपी राष्ट्रध्वज

मुंबई (विशेष् प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या ऐतिहासिक मुख्यालयासमोर ७५ फूट उंचीवर भव्य राष्ट्रध्वज

धारावी विकास प्रकल्पात 210 झाडे बाधित, 67 झाडे कापली जाणार, 143 झाडं पुनर्रोपित करणार; वृक्ष प्राधिकरणाने दिली मंजुरी

मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्पामधील धारावीमधील दोन ठिकाणच्या बांधकामांमधील बाधित झाडांचे प्रस्ताव

BMC : महापालिकेचे नगरसेवक निघणार बीडच्या जंगल सफारीवर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) BMC : उबाठाच्या पक्षतोड, वृक्षतोडच्या आरोपांचा समाचार सभागृहनेते गणेश खणकर यांनी घेत मध्य

गोरेगावमधील कृष्णवाटिका रोड, साई मार्ग ना फेरीवाला क्षेत्र? स्थायी समिती अध्यक्षांनी तातडीने सातत्यपूर्ण कारवाई करण्याचे दिले आदेश

गोरेगाव पूर्व येथील साई मार्ग आणि कृष्णवाटिका मार्गाच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरु आहे, त्यामुळे आधीच

दादर व चेंबूर येथील जलतरण तलावांची महिला - बालकल्याण समिती अध्यक्षांची अचानक पाहणी

दादर (पश्चिम) आणि चेंबूर येथील महानगरपालिका जलतरण तलावांना बुधवारी २५ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबई

Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकावरील धक्कादायक घटना, 60 वर्षीय महिलेला गर्दुल्यांने मारहाण करत अत्याचार

मुंबई: राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत महिलांच्या सुरक्षेचे धिंडवडे निघत असल्याचे पुन्हा एकदा समोर