
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) शनिवार आणि रविवारच्या सुट्टयांव्यतिरिक्त ऑक्टोबर महिन्यात काही निवडक दिवशी बंद राहील. तसेच यावर्षी मुहूर्त ट्रेडिंगची तारिख नोंद करून घेणं देखील महत्त्वाचं आहे. ऑक्टोबर महिन्यात NSE आणि BSE कधी बंद असेल जाणून घेऊया. एक्सचेंजच्या सुट्ट्यांच्या दिनदर्शिकेनुसार, ऑक्टोबर महिन्यात उर्वरित कालावधीसाठी भारतीय इक्विटी आणि इक्विटी डेरिव्हेटीव्ह बाजार हे खालील तारखांना बंद राहतील.
१७ ऑक्टोबर - शनिवार १८ ऑक्टोबर - रविवार २० ऑक्टोबर - दसरा २४ ऑक्टोबर - शनिवार २५ ऑक्टोबर - रविवार ३१ ऑक्टोबर - शनिवार
यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या उर्वरित दिवसांत एकूण सहा दिवस बाजार बंद राहील. मुहूर्त ट्रेडिंग हे दिवाळीच्या आसपास आयोजित केले जाणारे एक विशेष ट्रेडिंग सत्र असते. पारंपरिकरित्या गुंतवणूक करण्यासाठी हा एक शुभ काळ मानला जातो. याने नवीन हिंदू आर्थिक वर्षाची सुरुवात होते. यावर्षी, मुहूर्त ट्रेडिंग ८ नोव्हेंबर रोजी म्हणजेच रविवारी होणार आहे. शेअर बाजारचे सामान्य सत्र सकाळी ९:१५ ते दुपारी ३:३० पर्यंत चालते.
मुंबई : कौशल्य, भांडवल आणि तंत्रज्ञानाची सांगड घालणाऱ्या गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रात उत्कृष्ट परिसंस्था कार्यरत आहे. सर्वच क्षेत्रातील ...
इतर महत्त्वाच्या वेळा -
अंतिम लिलाव ऑर्डर नोंदणी - दुपारी ३:२० ते ३:३० ऑर्डर जुळवणी आणि व्यवहाराची पुष्टी - दुपारी ३:३० ते ३:३५ संक्रमण कालावधी - दुपारी ३:३५ ते दुपारी ३:५० समारोप सत्र - दुपारी ३:५० ते ४:००






