दसरा दिवाळीत शेअर मार्केट चालू राहणार की बंद? जाणून घ्या मुहूर्त ट्रेडिंगची तारीख

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) शनिवार आणि रविवारच्या सुट्टयांव्यतिरिक्त ऑक्टोबर महिन्यात काही निवडक दिवशी बंद राहील. तसेच यावर्षी मुहूर्त ट्रेडिंगची तारिख नोंद करून घेणं देखील महत्त्वाचं आहे. ऑक्टोबर महिन्यात NSE आणि BSE कधी बंद असेल जाणून घेऊया.

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) शनिवार आणि रविवारच्या सुट्टयांव्यतिरिक्त ऑक्टोबर महिन्यात काही निवडक दिवशी बंद राहील. तसेच यावर्षी मुहूर्त ट्रेडिंगची तारिख नोंद करून घेणं देखील महत्त्वाचं आहे. ऑक्टोबर महिन्यात NSE आणि BSE कधी बंद असेल जाणून घेऊया. एक्सचेंजच्या सुट्ट्यांच्या दिनदर्शिकेनुसार, ऑक्टोबर महिन्यात उर्वरित कालावधीसाठी भारतीय इक्विटी आणि इक्विटी डेरिव्हेटीव्ह बाजार हे खालील तारखांना बंद राहतील.


१७ ऑक्टोबर - शनिवार
१८ ऑक्टोबर - रविवार
२० ऑक्टोबर - दसरा
२४ ऑक्टोबर - शनिवार
२५ ऑक्टोबर - रविवार
३१ ऑक्टोबर - शनिवार


यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या उर्वरित दिवसांत एकूण सहा दिवस बाजार बंद राहील. मुहूर्त ट्रेडिंग हे दिवाळीच्या आसपास आयोजित केले जाणारे एक विशेष ट्रेडिंग सत्र असते. पारंपरिकरित्या गुंतवणूक करण्यासाठी हा एक शुभ काळ मानला जातो. याने नवीन हिंदू आर्थिक वर्षाची सुरुवात होते. यावर्षी, मुहूर्त ट्रेडिंग ८ नोव्हेंबर रोजी म्हणजेच रविवारी होणार आहे. शेअर बाजारचे सामान्य सत्र सकाळी ९:१५ ते दुपारी ३:३० पर्यंत चालते.



इतर महत्त्वाच्या वेळा -


अंतिम लिलाव ऑर्डर नोंदणी - दुपारी ३:२० ते ३:३०
ऑर्डर जुळवणी आणि व्यवहाराची पुष्टी - दुपारी ३:३० ते ३:३५
संक्रमण कालावधी - दुपारी ३:३५ ते दुपारी ३:५०
समारोप सत्र - दुपारी ३:५० ते ४:००

Comments
Add Comment

Arijit Singh Mumbai Concert : अरिजीत सिंगच्या मुंबई कॉन्सर्टची महागडी तिकीटं चर्चेत; किंमत ऐकून बसेल धक्का!

मुंबई : आपल्या जादूई आणि सुरांनी कोट्यवधी लोकांच्या मनावर राज्य करणारे लोकप्रिय गायक अरिजीत सिंग (अरिजित सिंह)

Ranbir kapoor: रणबीर कपूरच्या ‘रामायण’मधून उलगडणार जटायूची कथा, पहिली झलक पाहिली का?

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याच्या आगामी ‘रामायण’ या सुपरहिट चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढत आहे.

Ranji Trophy : मुंबईची विजयी सलामी; चंदीगडला डावाने हरवत बोनस गुणांची कमाई

मुंबई : रणजी ट्रॉफीच्या एलिट गट 'डी' मधील सलामीच्या सामन्यात गतविजेत्या मुंबई संघाने चंदीगडविरुद्ध धमाकेदार

रिंग मेट्रो प्रकल्पाबाबत ठाणेकरांशी संवाद साधणार, महा मेट्रोचे संचालक मुलाखतीतून देणार उत्तर

ठाणे: ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाबद्दल ठाणेकरांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. ठाणेकरांच्या मनामध्ये असलेल्या

Ranji Trophy : सिराजच्या संघाचा मोठा पराक्रम! तनय त्यागराजनच्या 9 विकेट्स, त्रिपुराचा पराभव

हैदराबाद : रणजी ट्रॉफी 2026-27 च्या हंगामाची सुरुवात हैदराबाद संघाने अत्यंत दणदणीत आणि शानदार पद्धतीने केली आहे.

AUS vs SA: ऑस्ट्रेलियाने दक्षिण अफ्रिकेला पहिल्या कसोटीत 214 धावांनी नमवलं, टीम इंडियाला असा होणार फायदा

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना डरबनच्या किंग्समीड मैदानात पार पडला. हा सामना