NHRC Internship 2026: विद्यार्थ्यांसाठी खास संधी! राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून इंटर्नशिप कार्यक्रम जाहीर; कसा कराल अर्ज?

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) आपल्या हिवाळी इंटर्नशिप प्रोग्रॅम २०२६ साठी अर्ज मागवले आहेत. ही इंटर्नशिप चार आठवड्यांच्या कालावधीची असून १४ डिसेंबर २०२६ ते ०८ जानेवारी २०२७ या कालावधीत दिल्ली येथे पार पडेल. तसेच इंटर्नशिप यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना १२,००० रुपयांचे विद्यवेतन देण्यात येईल. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग या इंटर्नशिपसाठी १०० विद्यार्थ्यांची निवड करेल. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज १५ ऑक्टोबर २०२६ रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सादर करणं आवश्यक आहे.

कोण अर्ज करू शकतात?


कायदा, पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि सामाजिक शास्त्रे व संबंधित क्षेत्रांमधील पात्र विषयांचा अभ्यास करणारे विद्यार्थी, पात्रतेच्या अटी पूर्ण करत असल्यास अर्ज करू शकतात. अर्जदाराचे वय १ ऑक्टोबर २०२६ रोजी २८ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे. तसेच त्यांनी इयत्ता १२ वी मध्ये आणि त्यांच्या पदवी किंवा पाच वर्षांच्या एकात्मिक अभ्यासक्रमाच्या पहिल्या सहा मित्रांपैकी प्रत्येक सत्रात किमान ६% गन मिळवलेले असावेत. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी NHRC ची एक महिन्याची उन्हाळी किंवा हिवाळी इंटर्नशिप पूर्ण केली आहे, ते या कार्यक्रमासाठी पुन्हा अर्ज करू शकत नाहीत.

इंटर्नशिपमध्ये काय शिकता येईल?


विद्यर्थ्यांना या इंटर्नशिपच्या माध्यमातून मानवाधिकार समस्या, आयोगाचे कार्य आणि भारतातील मानवाधिकारांशी संबंधित कायदे व धोरणांबद्दल जाणून घेण्याची संधी मिळेल. दिल्लीबाहेरून प्रवास करणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना अधिकृत सूचनेत नमूद केलेल्या अटींच्या अधीन राहून, त्यांच्या येण्या जाण्याच्या प्रवासासाठी स्लीपर वातानुकूलित थ्री टियर रेल्वेचे भाडे देखील मिळेल. तसेच इंटर्नशिप यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना १२,००० रुपये विद्यावेतन दिले जाईल.

असा कराल अर्ज


पात्र विद्यार्थी अधिसूचना आणि अर्ज प्रक्रिया तपासण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या nhrc.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात. उमेदवारांनी २५० शब्दांचे निवेदन तयार करावे आणि त्यांच्या शैक्षणिक संस्थेकडून शिफारसपत्र सादर करावे. अर्ज करण्यापूर्वी त्यांनी सर्व पात्रता अटी आणि आवश्यक कागदपत्रे तपासावीत.
Comments
Add Comment

एअर इंडियाच्या विमानाचे जयपूर येथे आपत्कालीन लँडिंग; नेमकं काय घडलं?

जर्मनीच्या फ्रेंकफर्ट येथून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे जयपूर एयरपोर्टवर आपत्कालीन लँडिंग

Bihar Boat Accident : बिहारमध्ये गंगा नदीत प्रवाशांनी भरलेली बोट उलटली; 13 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती

बिहार : बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील हाजीपूरजवळ गंगा नदीत प्रवाशांनी भरलेली बोट उलटल्याची दुर्घटना घडली आहे.

रियाधवरील हल्ल्याचे भीषण पडसाद! इंडिगो-अकासासह अनेक आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर 17 ऑक्टोबरपर्यंत टांगती तलवार

सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथील किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या भीषण क्षेपणास्त्र

अबब...! 1.23 लाखांची 10 रुपयांची नाणी देत खरेदी केली दुचाकी; तीन वर्षे नाणी जमा करून स्वप्न केलं साकार

तेलंगणा: तेलंगणातल्या मंचिर्याल जिल्ह्यातील लक्सेट्टिपेटमधील 51 वर्षीय बी. रवी जोसेफ यांनी पैसे साठवून आपलं

महाराष्ट्रापाठोपाठ आता गोव्यातही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष सुरू!

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते आज (१३ ऑक्टोबर) पणजी येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी

भारताचा दणका! लदाखमधील 28 ठिकाणांच्या नामांतरामुळे चीनची लाहीलाही; भारताने सुनावले खडेबोल

नवी दिल्ली : लदाखमधील 28 महत्त्वाच्या भौगोलिक आणि सामरिकदृष्ट्या संवेदनशील ठिकाणांना अधिकृत व प्रमाणित नावे