
जर्मनीच्या फ्रेंकफर्ट येथून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे जयपूर एयरपोर्टवर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमान हायजॅक होणार असल्याची पूर्वसूचना मिळाल्यानंतर हे लँडिंग करण्यात आले. सुरक्षा अभिकरणांनी तपास केल्यानंतर ही गोष्ट अफवा असल्याचे समजले. एअर इंडियाच्या फ्लाईट AI 2030 च्या संदर्भात अहमदाबाद आणि ट्राफिक कंट्रोल म्हणजेच एटीसीला सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी आपत्कालीन अलर्ट मिळाला होता.
यानंतर विमानाचा मार्ग बदलून विमानाचे जयपूर येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. काल रात्री 10:45 वाजता विमान टेकऑफ झालं होते. आपत्कालीन लँडिंग नंतर काहीकाळ विमानतळावर गोंधळ पसरला होता. विमानतळावरील सुरक्षा टीमसोबत जयपूर पोलीस, बॉम्ब निरोधक पथक, अग्निशामक दल आणि अन्य आपत्कालीन पथके विमानतळावर पोहोचली. तसेचग राजस्थान पोलीस देखील तेथे पोहोचले.
भारतीय संस्कृतीतील सर्वात पवित्र आणि अलौकिक अध्यात्मिक सोहळा मानला जाणारा 'सिंहस्थ कुंभमेळा' 2026 ते 2028 या कालावधीत नाशिक त्र्यंबकेश्वर येथे उत्साहात ...
सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा विमान मुंबई फ्लाइट इन्फॉर्मेशन रिजन (FIR) मध्ये होते, तेव्हा पायलटने 'स्क्वॉक कोड 7500' दाबला, जो बेकायदेशीर बाबीचा किंवा हायजॅकिंगचा संदेश देतो. वृत्तांनुसार, बोइंग 787-9 विमानची फ्लाईट AI2030 ने जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले आणि सुरक्षा तपासणीसाठी ते विमान मध्ये नेण्यात आले. मालवीय नगरच्या असिस्टंट कमिशनर शिव दयाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळ अधिकाऱ्यांनी पोलिसांना बॉम्बची धमकी आल्यानंतर आपत्कालीन लँडींगची सूचना दिली होती. सध्या विमानात कोटी प्रवासी होते याचा आकडा समोर आला नाही. यासंदर्भात अधिक माहिती मिळणे अपेक्षित आहे.





