Nitesh Rane : गरब्यात ओळखपत्राशिवाय प्रवेश देऊ नका - मंत्री नितेश राणे

खोटी नावे सांगून गरब्यात प्रवेश करणे, महिलांची छेडछाड करणे किंवा ‘लव्ह जिहाद’चा कथित प्रयत्न करणे सहन केले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. 

हनुमान चालीसा म्हणण्याची अट ठेवावी



मुंबई :
नवरात्रोत्सवातील गरबा आणि दांडियाच्या कार्यक्रमांत सहभागी होणाऱ्यांची ओळख तपासावी, तसेच ओळखपत्र दाखवण्यासह हनुमान चालीसा म्हणण्याची अट ठेवावी, अशी भूमिका राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी मांडली आहे. खोटी नावे सांगून गरब्यात प्रवेश करणे, महिलांची छेडछाड करणे किंवा ‘लव्ह जिहाद’चा कथित प्रयत्न करणे सहन केले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.



नवरात्रोत्सव हा हिंदूंचा सण असून गरबा आणि दांडियाला हिंदू परंपरेत विशेष महत्त्व आहे, असे राणे यांनी सांगितले. या उत्सवात सहभागी होण्यासाठी नाव किंवा ओळख लपवून प्रवेश करण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. नवरात्रोत्सवाच्या काळात ‘लव्ह जिहाद’च्या घटना वाढत असल्याचा आरोप करत त्यांनी विश्व हिंदू परिषदेच्या मागणीला पाठिंबा दर्शवला.



‘पोलिसांच्या काठीचा दांडिया चालेल’


गरबा आणि दांडियाच्या ठिकाणी महिलांची छेडछाड करणाऱ्या किंवा अनुचित वर्तन करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, असे राणे म्हणाले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. गरब्याच्या ठिकाणी संशयास्पद ओळख घेऊन येणाऱ्यांवर हिंदुत्ववादी संघटनांचे लक्ष असेल, असेही त्यांनी सांगितले.



डीजेला परवानगी नसेल तर....


डीजेच्या वापराबाबत बोलताना राणे यांनी सर्व धर्मांच्या मिरवणुकांसाठी समान नियम लागू करण्याची मागणी केली. गणेशोत्सवात डीजेला परवानगी नसेल, तर ईदच्या मिरवणुकांनाही समान निर्बंध लागू केले पाहिजेत, असे त्यांचे म्हणणे होते.


मलाडमधील गरबा-दांडियाच्या कार्यक्रमस्थळी लावण्यात आलेल्या फलकांबाबत विचारले असता, हिंदू इतर धर्मांच्या सणांमध्ये अडथळे निर्माण करत नाहीत, त्यामुळे हिंदूंच्या सणांमध्येही अडथळे आणू नयेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. राज्य सरकारची ‘लव्ह जिहाद’विरोधातील भूमिका स्पष्ट असल्याचेही राणे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Chief Minister Devendra Fadnavis: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजारांची मदत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; केंद्राच्या मदतीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत राज्याकडून तातडीचा

Ghatkopar accident : घाटकोपरमध्ये बेस्ट बस आणि टँकरचा अपघात; बसच्या काचा फुटल्या, दोन तरुणी जखमी

मुंबई :  मुंबईतील घाटकोपर पूर्वेकडील छेडा नगर सिग्नल परिसरात बेस्ट बस आणि टँकर यांच्यात अपघात झाल्याची घटना

Pusad Accident : पुसद-दिग्रस मार्गावर भीषण अपघात; ट्रकच्या चाकाखाली येऊन स्कुटीवरील दोघांचा मृत्यू

पुसद : पुसद-दिग्रस मार्गावरील पुस नदीच्या नवीन पुलावर ट्रक आणि स्कुटीचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत स्कुटीवरून

Wastewater Reuse : सोसायट्यातील झाडांना सांडपाणी किंवा वापरानंतरच्या पाण्याचा वापर करा, महापालिकेने केले गृहनिर्माण संस्थांना आवाहन

मुंबई विशेष प्रतिनिधी झाडांना पाणी देताना शक्यतो पिण्याच्या पाण्याचा वापर टाळावा. त्याऐवजी सांडपाणी

Draft Voter List 2026 : प्रारूप मतदार यादीवर हरकती दाखल करण्यास २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत, दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी

BMC : प्रकल्प कामे अंतिम टप्प्यात, महापालिकेचा मुदतठेवींना हात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवींच्या रकमेची चर्चा कायमच होत असते. मार्च महिन्यात मुदत