IND vs WI: शाई होपने भारतीय गोलंदाजांना धुतलं, शतक ठोकत टीम इंडियाला बॅकफूटला ढकललं

भारताविरुद्धच्या चौथ्या टी20 सामन्यात शाई होपची बॅट पुन्हा एकदा तळपली. त्याने भारतीय गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. तसेच ख्रिस गेलच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.

भारत वेस्ट इंडिज मालिकेतील चौथा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावल्याने वेस्ट इंडिजच्या वाटेला प्रथम फलंदाजी आहे. पण या वेस्ट इंडिजने या संधीचा पुरेपूर फायदा उचलला. कर्णधार शाई होपने पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांवर जोरदार प्रहार केला. समोर येईल त्या गोलंदाजाला फोडून काढलं. त्याला रोखणं भारतीय गोलंदाजांना कठीण झालं. कारण चेंडू कुठे टाकावा हाच प्रश्न पडला होता. शाई होपने 28 चेंडूत अर्धशतक ठोकलं. त्याने षटकार मारला आणि अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर इतक्यावरच थांबला नाही त्याने पुढे आपला झंझावाती खेळ सुरूच ठेवला आणि शतक ठोकलं. त्याच्या शतकी खेळीमुळे 20 षटकात 3 गडी गमवून 247 धावा केल्या. तसेच विजयासाठी 248 धावांचं आव्हान ठेवलं आहे.

शाई होपचं झंझावाती शतक


शाई होपने 50 चेंडूत 4 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने नाबाद 102 धावांची खेळी केली. त्याने 204 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. शेवटच्या चेंडूवर त्याला शतकासाठी 10 धावांची गरज होती. पण नितीश कुमार रेड्डीच्या दोन्ही चेंडूवर षटकार ठोकले आणि शतक पूर्म केलं. या मालिकेतील शाई होपने दुसरं शतक ठोकलं आहे. तसेच भारत दौऱ्यातील त्याचं चौथं शतक आहे. यापूर्वी त्याने वनडेत दोन शतकं ठोकली होती. त्यामुळे शाई होप जबरदस्त फॉर्मात आहे हे दिसून येतं.


शाई होपचा असाही विक्रम


द्विपक्षीय टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेत तीन वेळा 50पेक्षा जास्त धावा करणारा शाई होप हा वेस्ट इंडिजचा दुसरा फलंदाज आहे. यापूर्वी 2022 मध्ये भारतात झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत निकोलस पूरननेही अशाच प्रकारच्या अर्धशतकी खेळी केल्या होत्या. द्विपक्षीय टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेत सर्वाधिक 50 पेक्षा जास्त धावा करणारे कर्णधार म्हणून विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवची बरोबरी केली आहे. विराट कोहली होमग्राउंडवर इंग्लंडविरुद्ध 2021 मध्ये तीन अर्धशतकं ठोकली होती. तर सूर्यकुमार यादवने होमग्राउंडवर 2023 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध असाच पराक्रम केला होता. पाकिस्तानच्या साहिबजादा फरहान याने घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध अशीच कामगिरी केली होती. पण शाई होपने कर्णधार म्हणून विदेशी भूमीवर तीन अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम केला आहे.
Comments
Add Comment

मिनी लीलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मोठा डाव! दिग्गज खेळाडूला सोडलं आणि वाचवले 10.35 कोटी

इंडियन प्रीमिअर लीग (IPL) सुरू होण्यापूर्वीच संघ बांधणीसाठी जोरदार हालचालींना सुरुवात झाली आहे. आयपीएलमधील ताज्या

शाही मार्गावर क्रिकेटचा थरार! प्रिन्स विल्यम यांच्यासोबत सौरव गांगुली आणि अजिंक्य रहाणेचा बॅटमधून जलवा

लंडन : क्रिकेटची आवड आणि पर्यावरणीय संरथाचा संदेश देणारा एक अनोखा नजराणा लंडनच्या रस्त्यांवर पाहायला मिळाला.

IND vs WI, 4th T20: नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने, वैभव संघात आहे की नाही? श्रेयस अय्यर म्हणाला..

भारत आणि वेस्ट इंडिज चौथ्या टी20 सामन्यासाठी आमनेसामने आले आहे. खरं तर या सामन्यात वेस्ट इंडिजची करो या मरोची

Asian Games : आशियाई क्रीडा स्पर्धेतील हिरोंशी थेट संवाद साधणार पंतप्रधान नरेंद्र मोदी; काय होणार मोठा खुलासा?

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताच्या खेळाडूंनी इतिहास

Rohit Sharma on Jasprit Bumrah : 'बुमराह क्रिकेटर नसता तर...' रोहित शर्माने दिलेलं उत्तर एकदा पहाच

रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह हे दोघेही भरती क्रिकेट टीमसाठी जणू काही आधारस्तंभ राहिले आहेत. जशी हिऱ्याची पारख

ICC Latest Rankings : श्रेयस अय्यरची कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी; ऑस्ट्रेलियाचीही झेप

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) ताज्या कसोटी आणि टी-20 क्रमवारीत मोठे फेरबदल पाहायला मिळाले आहेत. डर्बन