IND vs WI, 4th T20: नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने, वैभव संघात आहे की नाही? श्रेयस अय्यर म्हणाला..

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात चौथा टी20 सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तसेच प्लेइंग 11 बाबत निर्णय काय आहे ते सांगून टाकलं.

भारत आणि वेस्ट इंडिज चौथ्या टी20 सामन्यासाठी आमनेसामने आले आहे. खरं तर या सामन्यात वेस्ट इंडिजची करो या मरोची स्थिती आहे. कारण हा सामना गमावला तर मालिका हातून जाणार आहे. दुसरीकडे, हा सामना भारताने गमावली तरी पाचव्या सामन्यात संधी असणार आहे. पण नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागल्याने विजयाची संधी आहे. नाणेफेकीचा कौल जिंकताच कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय खेळपट्ट्यांचा अंदाज घेता धावांचा पाठलाग करणं सोपं असतं. त्यामुळे हा सामना नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर भारताच्या बाजूने झुकला आहे. श्रेयस अय्यर म्हणाला की, ' आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. पहिल्या डावात खेळपट्टी कशी खेळते याची आम्हाला बऱ्यापैकी कल्पना आहे. त्यामुळे, त्या आधारावर आम्ही हा निर्णय घेतला.'



काय म्हणाला श्रेयस अय्यर?


खेळपट्टीच्या ग्राऊंड्समनच्या मूल्यांकनाबद्दल आणि अपेक्षित परिस्थितीबद्दल श्रेयस अय्यर म्हणाला की, 'खेळपट्टी 75 टक्के लाल आणि 25 टक्के काळी आहे आणि आम्ही यापूर्वी अशा खेळपट्ट्यांवर खेळलो आहोत. पण अर्थातच, परिस्थिती पाहता आणि दव पडणार नसल्याने, सामना थोडा तीव्र होणार आहे आणि खेळपट्टीवर उसळीही मिळेल, कारण मी खेळपट्टी पाहिली आहे. ती बरीच कठीण आहे.'


श्रेयस अय्यर पुढे म्हणाला की, 'हा आमच्यासाठी एक निर्णायक सामना असणार आहे आणि आम्हाला अशा मानसिकतेत राहावे लागेल जिथे आम्ही आत्मसंतुष्ट होऊ शकत नाही, कारण वेस्ट इंडिजचा संघ किती विध्वंसक आहे हे आम्हाला माहीत आहे. त्यांच्याकडे नवव्या क्रमांकापर्यंत एक शक्तिशाली फलंदाजांची फळी आहे. तर हे सर्व विचार मनात ठेवून पुढे जाताना, मला वाटते की आपण खंबीर मानसिकतेत राहिले पाहिजे आणि प्रत्येक सत्रात विजय मिळवला पाहिजे.' श्रेयस अय्यर प्लेइंग 11 बाबत म्हणाला की, आम्ही तोच संघ घेऊन खेळणार आहोत. म्हणजेच वैभव सूर्यवंशीला या सामन्यात स्थान मिळालेलं नाही.




दोन्ही संघांची प्लेइंग 11


वेस्ट इंडिज (प्लेइंग इलेव्हन): शाई होप (विकेटकीपर/कर्णधार), ज्वेल अँड्र्यू, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड, रोस्टन चेस, कीमो पॉल, शामर स्प्रिंगर, गुडाकेश मोती, शामर जोसेफ.


भारत (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), टिळक वर्मा, नमन धीर, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, मयंक यादव.

Comments
Add Comment

शाही मार्गावर क्रिकेटचा थरार! प्रिन्स विल्यम यांच्यासोबत सौरव गांगुली आणि अजिंक्य रहाणेचा बॅटमधून जलवा

लंडन : क्रिकेटची आवड आणि पर्यावरणीय संरथाचा संदेश देणारा एक अनोखा नजराणा लंडनच्या रस्त्यांवर पाहायला मिळाला.

Asian Games : आशियाई क्रीडा स्पर्धेतील हिरोंशी थेट संवाद साधणार पंतप्रधान नरेंद्र मोदी; काय होणार मोठा खुलासा?

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताच्या खेळाडूंनी इतिहास

Rohit Sharma on Jasprit Bumrah : 'बुमराह क्रिकेटर नसता तर...' रोहित शर्माने दिलेलं उत्तर एकदा पहाच

रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह हे दोघेही भरती क्रिकेट टीमसाठी जणू काही आधारस्तंभ राहिले आहेत. जशी हिऱ्याची पारख

ICC Latest Rankings : श्रेयस अय्यरची कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी; ऑस्ट्रेलियाचीही झेप

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) ताज्या कसोटी आणि टी-20 क्रमवारीत मोठे फेरबदल पाहायला मिळाले आहेत. डर्बन

Denmark Open : सिंधू अन् लक्ष्य सेन पहिल्याच फेरीत गारद; डेन्मार्क ओपनमध्ये भारताला मोठा झटका

ओडेन्से (डेन्मार्क) : डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेतून भारतासाठी एक अत्यंत निराशेची बातमी समोर आली आहे. भारताचे

जोस बटलर आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी निवडले 21व्या शतकातील टेस्ट गोलंदाज; टॉप 10 गोलंदाज कोण?

लंडन : इंग्लंडचा यष्टीरक्षक-फलंदाज जोस बटलर आणि माजी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड यांनी 21व्या शतकातील