Koffee with Karan: - "मेरे करण अर्जुन आएंगे..." निर्माता करण जोहर नवा चित्रपट आणण्याच्या तयारीत...

करण जोहर 'कॉफी विथ करण' चा नवीन सीझन घेऊन येत आहे

चित्रपट निर्माता करण जोहरयाने आजवर वेगवेगळ्या कार्यक्रमातून चाहत्याची मने जिंकली आहेत. आता करण जोहर 'कॉफी विथ करण' या शोचा नवीन सीझन घेऊन आला आहे. Koffee with Karan’च्या 9व्या सीझनमध्ये सर्वांत मोठा बदल म्हणजे हा शो शेवटचा सीझन असणार आहे! हा नववा आणि शेवटचा सीझन बुधवारपासून सुरू होत आहे. नेहमीप्रमाणेच, अनेक मोठे कलाकार या शोमध्ये पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. सलमान खान हा या नवव्या सीझनचा पहिला पाहुणा आहे.करणने त्याच्यासमोर आपली एक अत्यंत मोठी इच्छा व्यक्त केली आहे.(Koffee with Karan)





क्रिकेटपटूंना आमंत्रण नाही?


या सीझनसाठी क्रिकेटपटूंना आमंत्रित केले जाणार नसलयाचे करण जोहरने प्रोमोमध्ये सांगितले आहे. हा या सीझनमधील चर्चेचा मुद्दा बनला आहे.




सीझन 9 मध्ये काय वेगळं आहे?


नातेसंबंध आणि वैयक्तिक आयुष्यावरील प्रश्न या शोचे वैशिष्ट्य आहे. रॅपिड फायर , वैयक्तिक प्रश्न आणि मजेशीर गप्पा पुन्हा पाहायला मिळणार आहेत. सलमान खानच्या प्रोमोमध्ये त्याच्या नातेसंबंधांबद्दलही प्रश्न विचारण्यात आले आहेत.




करण जोहर शाहरुख आणि सलमान खानला पुन्हा एकत्र आणणार


'कॉफी विथ करण'च्या 9व्या सीझनच्या पहिलया भागातील 'रॅपिड फायर' राऊंडमध्ये करण जोहर आपली सर्वात मोठी इच्छा व्यक्त करताना दिसणार आहे. करण जोहरला पहिल्या भागात विचारण्यात आले कि "एक दिवस अचानक शाहरुख खान म्हणून जाग आली तर काय कराल, या प्रश्नावर त्याने सांगितले की, सर्वात आधी तो शाहरुखलाच फोन करेल. तसेच, शाहरुख आणि सलमान खानला घेऊन पुन्हा एकदा एखादा चित्रपट दिग्दर्शित करण्याची इच्छाही त्याने व्यक्त केली आहे.(Karan Johar)





शेवटचा चित्रपट 'टायगर 3' मध्ये दिसली होती शाहरुख आणि सलमान खान यांची जोडी


शाहरुख खान आणि सलमान खान हे बॉलीवूडमधील सर्वात मोठ्या कलाकारांपैकी एक आहेत. सलमान बॉलीवूडमध्ये 38 वर्षांपासून काम करत आहे, तर शाहरुख खानने चित्रपटसृष्टीत 34 वर्षे पूर्ण केली आहेत. या दोन ताऱ्यांनी सर्वप्रथम 'करण अर्जुन' या चित्रपटात एकत्र काम केले होते. दरम्यान, करणने यांचा 'कुछ कुछ होता है' या चित्रपटात ते एकत्र दिसले होते. शाहरुखची मुख्य भूमिका असलेलया या चित्रपटात सलमानने एक छोटीशी भूमिका (कॅमिओ) साकारली होती.(Salman Khan)


त्यानंतर, शाहरुखने सलमानच्या 'हर दिल जो प्यार करेगा' या चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारली. पुढे, सलमान शाहरुखच्या 2007 मधील 'ओम शांती ओम' या चित्रपटातील "दीवानगी दीवानगी" या गाण्यात झळकला. त्यानंतर सलमानने शाहरुखच्या 2018 मधील 'झिरो' या चित्रपटात कॅमिओ केला. यानंतर, शाहरुखने 'टायगर ३' मध्ये कॅमिओ केला; 2023 मधील या चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका होत्या. दरम्यान, त्याच वर्षी 2023 मध्ये सलमानने शाहरुखच्या 'पठाण' या चित्रपटातही विशेष भूमिका साकारली.(Sharukha Khan)





22 वर्षांनी संपणार 'कॉफी विथ करण' चा प्रवास


'कॉफी विथ करण'चा पहिला सीझन 2004 मध्ये सुरू झाला आणि आता त्याच शोचा नववा व अंतिम सीझन येत आहे. करणने जाहीर केले आहे की, यानंतर 'कॉफी विथ करण'चा सेट पुन्हा कधीही उभारला जाणार नाही.

Comments
Add Comment

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरात वातावरण तापलं! नकुलसाठी आसिफवर चिडली लव्ह; यंग आणि स्काऊटमध्ये सुद्धा बाचाबाची

Bigg Boss 20 च्या घरात नेहमीच काहीना काही रंजक गोष्टी घडत असतात. अनेकदा स्पर्धकांमध्ये भांडणं होतात. कधी कधी तर ही भांडणं

Koffee With Karan Season 9: करण जोहरच्या शोचा अखेरचा सीझन; पुन्हा रंगणार सेलिब्रिटींचा बेधडक अंदाज?

मुंबई : लोकप्रिय सेलिब्रिटी चॅट शो ‘कॉफी विथ करण’चा नववा सीझन प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे. करण जोहर होस्ट करत

Pahla pyaar doosri baar Posters : सहा नव्या जोड्या, प्रेमाची नवी गोष्ट! ‘पहला प्यार दूसरी बार’च्या हटके पोस्टर्सनी वाढवली उत्सुकता

लव्ह फिल्म्सने सहा नव्या चेहऱ्यांच्या जोड्यांचे आकर्षक पोस्टर्स प्रदर्शित केले आहेत. या पोस्टर्समधून

Rashmika & Vijay : रश्मिका आणि विजयचा शाही अंदाज! 'रणबाली'च्या प्रमोशनसाठी हैदराबादमध्ये केले खास ट्विनिंग

सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) आणि विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) यांनी त्यांच्या आगामी 'रणबाली' या

The Raja Saab : ‘द राजा साब’च्या अपयशामागे संक्रांतीची रिलीज ठरली कारणीभूत? निर्मात्यांनी सांगितली चूक

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘द राजा साब’ प्रदर्शनापूर्वी चांगलाच चर्चेत होता. मात्र,

King khan: किंग खानचा चाहत्यांसाठी गुड न्यूज, शारुखच्या वाढदिवशी फॅन्सला मिळणार खास गिफ्ट

मुंबई: शाहरुख खानच्या आगामी 'किंग' या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता वाढली आहे. चित्रपटाच्या