
लंडन : क्रिकेटची आवड आणि पर्यावरणीय संरथाचा संदेश देणारा एक अनोखा नजराणा लंडनच्या रस्त्यांवर पाहायला मिळाला. राजघराण्यातील शाही मार्गावर (द मॉल) पार पडलेल्या एका विशेष आणि मैत्रीपूर्ण टेनिस-बॉल क्रिकेट सामन्यात भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली आणि नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे यांनी सहकऱ्यांसह धुमाकूळ घातला. प्रिन्स विल्यम यांच्या विशेष निमंत्रणावरून हा सामना खेळवला गेला.
शाही दरबाराबाहेर क्रिकेटचा जल्लोष
बकिंगहॅम पॅलेसच्या बाहेर असणारा 'द मॉल' हा मार्ग सहसा भव्य शाही मिरवणुकींसाठी राखीव असतो. मात्र, या दिवशी या ऐतिहासिक रस्त्यावर क्रिकेटचा थरार रंगला होता. 'द रॉयल फाउंडेशन'च्या 'अर्थशॉट प्राइज' पुरस्कार सोहळ्याच्या पूर्वतयारीचा हा एक भाग होता, ज्याचा मुख्य सोहळा आगामी 17 नोव्हेंबर रोजी मुंबईत पार पडणार आहे. या मैत्रीपूर्ण सामन्यात भारताच्या दिग्गज खेळाडूंसोबतच वेस्ट इंडिजचे महान खेळाडू ब्रायन लारा आणि इंग्लंडचे स्टार खेळाडू जो रूट व हॅरी ब्रूक यांनीही सहभाग घेत सामन्याची रंगत वाढवली.
अजिंक्य रहाणेने व्यक्त केल्या भावना
लंडनमधील या अविस्मरणीय अनुभवाबद्दल बोलताना अजिंक्य रहाणे म्हणाला, "क्रिकेटमुळे मला जगभरात फिरण्याची संधी मिळाली, पण बकिंगहॅम पॅलेसच्या पार्श्वभूमीवर टेनिस-बॉल क्रिकेट खेळणे हा माझ्यासाठी अत्यंतखास आणि कधीही न विसरता येणारा अनुभव आहे." भारत आणि युनायटेड किंगडममधील क्रिकेटवरील सामायिक प्रेमाचा हा उत्सव होता, असेही त्याने नमूद केले.
नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताच्या खेळाडूंनी इतिहास रचला आहे. भारताने या महाउत्सवात तुफानी ...
पर्यावरणासाठी खेळाचा अनोखा संदेश
यावेळी सर्व दिग्गजांनी केवळ क्रिकेटचा आनंदच लुटला नाही, तर मैदानातील सीमा-रेषांच्या पलीकडे जाऊन शाश्वत पर्यावरण आणि पृथ्वीच्या संरक्षणासाठी सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व जगासमोर मांडले. प्रिन्स विल्यम यांनी सुरू केलेल्या 'अर्थशॉट प्राइझ' उपक्रमांतर्गत या सोहळ्याची आगामी तारीख जवळ येत असताना, लंडनमधील या विशेष सामन्याने संपूर्ण क्रीडाविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.




