Wednesday, October 14, 2026

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरात वातावरण तापलं! नकुलसाठी आसिफवर चिडली लव्ह; यंग आणि स्काऊटमध्ये सुद्धा बाचाबाची

Bigg Boss 20 च्या घरात नेहमीच काहीना काही रंजक गोष्टी घडत असतात. अनेकदा स्पर्धकांमध्ये भांडणं होतात. कधी कधी तर ही भांडणं मारामारीपर्यंत जातात. यावेळी सुद्धा असंच काहीसं घडलंय.नुकतेच वाइल्ड कार्ड स्पर्धक नकुल धुल आणि गुल्लू यांच्यातील भांडणानंतर आता घरात एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. आगामी भागाचा एक प्रोमो समोर आला असून, यामध्ये आसिफ खान आणि लव गिल यांच्यात तीव्र वाद पाहायला मिळणार आहे. समोर आलेल्या प्रोमोनुसार, लव गिल ही नकुल धुलजवळ बसलेली असते, ज्यावर आसिफ खान संताप व्यक्त करतो. आसिफ थेट लव्हला जाब विचारतो की ती नकुलच्या शेजारी का बसली आहे आणि हे त्याला अजिबात आवडलेले नाही. यावर उत्तर देताना लव स्पष्ट करते की तिने नकुलसोबत कोणतीही चुकीची चर्चा केलेली नाही. मात्र, आसिफ तिचे काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो आणि तो नकुलसोबत बसल्याबद्दल लववर आक्रमक होतो. या वादानंतर दोघांमध्ये जोरदार बाचाबाची होते आणि दोघेही एकमेकांवर ओरडू लागतात. या वादादरम्यान आसिफ रागाच्या भरात लवला 'चापलूस' आणि 'गवार' असे शब्दही बोलून जातो. घरातील इतर सदस्य मध्यस्थी करून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

स्काउट आणि यंग यांच्यातही मतभेद

या संपूर्ण प्रकरणामुळे घरातील इतर सदस्यांमध्येही दुरावा निर्माण होत असल्याचे दिसत आहे. आणखी एका प्रोमोमध्ये, यंग हा स्काउटकडे तक्रार करताना दिसतो की तो नकुलचे समर्थन का करत आहे. यंग लव्हला देखील समजावण्याचा प्रयत्न करतो की तिने नकुलच्या जवळ बसू नये. मात्र, स्काउट लव्हची बाजू घेतो, ज्यामुळे यंग आणि स्काउट यांच्यातही वाद सुरू होतो. यावर लव्ह देखील स्काउटवर संताप व्यक्त करते आणि स्पष्टपणे सांगते की तिला कोणीही सांगणार नाही की तिने काय करावे आणि काय नाही. घरामध्ये नकुलच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा वाद आता इतर सदस्यांमधील नातेसंबंध बिघडवताना दिसत आहे. आगामी एपिसोडमध्ये हा वाद आणखी किती टोकाला जातो, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >