पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला शिवसेना, राष्ट्रवादी निवडून आणणार - मुख्यमंत्री फडणवीसांचा दावा

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस निवडून आणतील, असा मोठा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

पुणे : पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे आणि शिवसेनेचा पाठिंबा असलेले अपक्ष उमेदवार सचिन सानप आमनेसामने असताना, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपच्याच उमेदवारासाठी काम करतील, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केला. महायुतीतील घटक पक्षांनी परस्परविरोधी उमेदवारांना पाठिंबा दिल्याने मतविभाजनाची शक्यता निर्माण झाली आहे. या राजकीय पेचाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, आमदार आणि मंत्री गावडे यांच्यासाठी प्रयत्न करतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चाही त्यांनी फेटाळल्या.


पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून भाजप आणि शिवसेनेत सुरू असलेल्या रस्सीखेचमुळे महायुतीसमोर पेच निर्माण झाला आहे. भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली, तर शिवसेनेने अपक्ष सचिन सानप यांना पाठिंबा दिला आहे. शिवसेनेकडून मंगेश चिवटे यांना एबी फॉर्म देण्यात आला होता; मात्र, त्यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर ही जागा भाजपला मिळाल्याचे चित्र निर्माण झाले. त्यानंतर शिवसेनेने सानप यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली. सानप हे मंत्री उदय सामंत यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे भाजप आणि शिवसेना या मित्रपक्षांतील मतविभाजनाचा मुद्दा निवडणुकीच्या केंद्रस्थानी आला आहे.


या पार्श्वभूमीवर पुणे शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी, कोणाची कोणाशी जवळीक असली तरी पुणे शिक्षक आणि पदवीधर या दोन्ही मतदारसंघांत शिवसेना व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार आणि मंत्री भाजपच्या उमेदवारांचे काम करतील, असे सांगितले. महायुतीच्या जागावाटपानुसार नागपूर, पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक या तीन जागांवर भाजपचे उमेदवार आहेत. अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचा, तर छत्रपती संभाजीनगर विभागात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आहे. या जागांवर संबंधित पक्षांना महायुतीतील अन्य घटक पक्षांचे कार्यकर्ते मदत करतील आणि पाचही जागांवर महायुतीचा विजय होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.


पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपच्या डॉ. स्मिता जाधव उमेदवार आहेत. या जागेसाठी शरद लाड आणि भैया माने यांनीही तयारी केली होती. पक्षाच्या विनंतीनंतर त्यांनी जाधव यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. भैया माने कोल्हापूर जिल्ह्यात, तर शरद लाड सांगलीसह अन्य जिल्ह्यांत निवडणुकीची जबाबदारी सांभाळत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील मतदारांपर्यंत पोहोचून मतदान वाढविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.



एकनाथ शिंदेंबद्दल काय म्हणाले फडणवीस?



  • दरम्यान, धाराशिवसह काही मतदारसंघांत भाजपच्या उमेदवारांसाठी मतदारनोंदणी कमी झाल्याच्या प्रश्नावर फडणवीस यांनी नगरसेवक आणि आमदारांची कानउघाडणी केल्याचे वृत्त नाकारले. बैठकीला सर्व नगरसेवक आणि आमदार उपस्थित होते, असे सांगत निवडणुका पूर्ण ताकदीने लढविण्यासाठी प्रत्येकाने सक्रिय सहभाग घ्यावा, अशी अपेक्षा आपण व्यक्त केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  • एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना, “शिंदे साहेब नाराज नाहीत, तुम्ही सगळे नाराज आहात. त्यांच्याबद्दल विनाकारण अफवा पसरवता,” असे फडणवीस म्हणाले.

Comments
Add Comment

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Maratha Reservation: मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वाची बैठक, समाजाच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयांची ग्वाही

मुंबई: मराठा समाजाच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक उपसमितीचे

महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला नवी झेप; ह्युंदाई मोटर प्रकल्पाचे पुण्यात दिमाखात उद्घाटन, मंत्री उदय सामंत काय म्हणाले?

पुणे :

Jayakumar Rawal : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सोयाबीन, तूर, उडदाला किती मिळणार हमीभाव? 950 खरेदी केंद्रे सज्ज

मुंबई : केंद्र शासनाच्या हमीभाव खरेदी योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2026-27 मध्ये सोयाबीन, मूग, उडीद व तूर खरेदीसाठी

IND vs WI: शाई होपने भारतीय गोलंदाजांना धुतलं, शतक ठोकत टीम इंडियाला बॅकफूटला ढकललं

भारत वेस्ट इंडिज मालिकेतील चौथा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सुरू आहे. या

Metro 4 आणि 4 अ मार्गिकेच्या मेट्रोचं अनावरण, ठाणेकरांची अखेर प्रतिक्षा संपली; केव्हापासून घडणार मेट्रो सफर?

ठाणे: मेट्रो 4 आणि मेट्रो 4 अ संबंधित महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ठाणेकर गेल्या अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची