Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात गुरुवार, 15 ऑक्टोबर रोजी मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सुरू असलेली घसरण आजही कायम असून, 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅममागे तब्बल 2,420 रुपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांचे लक्ष पुन्हा एकदा सराफा बाजाराकडे लागले आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरातही घसरण नोंदवण्यात आली आहे.
24 आणि 22 कॅरेट सोन्याचे नवे दर काय ?
आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,46,090 रुपये आहे. बुधवारी हाच दर 1,48,510 रुपये होता. म्हणजेच एका दिवसात सोन्याच्या किमतीत 2,420 रुपयांची घट झाली आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. आज 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1,33,916 रुपये असून, काल हा दर 1,36,134 रुपये होता. त्यामुळे 22 कॅरेट सोन्याच्या किमतीत 2,218 रुपयांची घट नोंदवण्यात आली आहे.
चांदीच्या दरातही मोठी घसरण
सोन्याबरोबरच चांदीच्या किमतीतही घसरण दिसून येत आहे. 925 स्टर्लिंग सिल्व्हरचा दर प्रति किलोग्रॅम 1,92,715 रुपये नोंदवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, दीर्घकाळ तेजी अनुभवल्यानंतर चांदीचा हा दर 2 लाख रुपयांच्या महत्त्वपूर्ण पातळीखाली आला आहे. जागतिक बाजारात झालेली विक्री आणि देशांतर्गत बाजारातील गुंतवणूकदारांकडून करण्यात आलेली नफावसुली ही या घसरणीमागील संभाव्य कारणे मानली जात आहेत.
मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना उपयोगी ठरू शकतात. पोस्ट ऑफिसच्या ...
गुरुवार, 15 ऑक्टोबर रोजी विविध शहरांतील 24 कॅरेट सोन्याचे दर पुढीलप्रमाणे आहेत:
शहरनिहाय 24 कॅरेट सोन्याची किंमत (प्रति 10 ग्राम):
दिल्ली: 1,45,580 रुपये
मुंबई: 1,45,830 रुपये
कोलकाता: 1,45,630 रुपये
चेन्नई: 1,46,250 रुपये
हैदराबाद: 1,46,060 रुपये
बैंगलुरु: 1,45,940 रुपये
शहरनिहाय 22 कॅरेट सोन्याची किंमत (प्रति 10 ग्राम):
दिल्ली: 1,33,448 रुपये
मुंबई: 1,33,678 रुपये
कोलकाता: 1,33,494 रुपये
चेन्नई: 1,34,063 रुपये
हैदराबाद: 1,33,888 रुपये
बेंगलुरु: 1,33,778 रुपये
शहरनिहाय चांदीची किंमत (प्रति किलोग्राम):
दिल्ली: 2,07,600 रुपये
मुंबई: 2,07,960 रुपये
कोलकाता: 2,07,680 रुपये
चेन्नई: 2,08,560 रुपये
हैदराबाद: 2,08,290 रुपये
बेंगलुरु: 2,08,120 रुपये
सोने खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
सोन्याच्या दरात झालेली घसरण ग्राहकांसाठी दिलासादायक ठरू शकते. मात्र, दागिने खरेदी करताना केवळ सोन्याचा बाजारभाव पाहणे पुरेसे नाही. प्रत्यक्ष खरेदीची किंमत ठरवताना दागिन्यांचे घडणावळ शुल्क, लागू जीएसटी आणि इतर आकार लक्षात घेणे आवश्यक आहे. तसेच, वरील दर हे आकडेवारीवर आधारित आहेत. प्रत्यक्ष सराफा बाजारातील दर, शुद्धता, विक्रेता आणि लागू शुल्कांनुसार अंतिम किंमत बदलू शकते. खरेदी करण्यापूर्वी स्थानिक ज्वेलर्सकडून ताजे दर तपासून घ्यावेत.