
Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या दुर्घटनेत दुचाकीवर प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असून, मृतांमध्ये तीन लहान बालकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मालदाभाडी गावाजवळ भीषण दुर्घटना
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास जामनेर तालुक्यातील मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील सहाही जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृत व्यक्ती मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील रहिवासी असल्याचे वृत्त आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्याने दुर्घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे. मृतांमध्ये तीन बालकांचाही समावेश आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मसाल्यांचे उत्पादन, साठवणूक, ...
अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट
दरम्यान, ट्रक आणि दुचाकी यांच्यात अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही. दुचाकीवरील प्रवाशांची अधिकृत ओळख, अपघाताची नेमकी परिस्थिती आणि इतर तपशीलांची अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे. एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मन सुन्न करणारी आहे.



