Maharashtra weather : महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज; कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता, मुंबईत उकाडा वाढणार

सांगली, सातारा, धाराशिव, सोलापूर, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतही पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मुंबई : महाराष्ट्रात एकीकडे उष्णतेचा तडाखा वाढत असताना दुसरीकडे काही भागांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासांत सिंधुदुर्गातून पावसाला सुरुवात होऊन तो हळूहळू कोकणातील इतर भागांत सरकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून, काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे.



कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता


हवामानाच्या अंदाजानुसार, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडसह कोकणातील काही भागांत पाऊस पडू शकतो. सांगली, सातारा, धाराशिव, सोलापूर, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतही पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.


पुणे, पुणे घाटमाथा, सातारा, सातारा घाटमाथा आणि सांगली परिसरात मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथा आणि सोलापूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आल्याचे दिलेल्या हवामान माहितीत नमूद आहे.



मुंबईत उकाडा कायम; 20 ऑक्टोबरला पावसाचा अंदाज


मुंबई, मुंबई उपनगर आणि आसपासच्या परिसरात तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त असून, दुपारच्या वेळी घराबाहेर पडणेही कठीण होत आहे. सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत उन्हाचा त्रास अधिक जाणवू शकतो. दरम्यान, 20 ऑक्टोबर रोजी मुंबईत पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.



उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेचा तडाखा


उत्तर महाराष्ट्रात तापमान सामान्यपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र-गुजरात सीमेलगतच्या भागातही उष्णतेचा प्रभाव जाणवू शकतो. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत उष्णता वाढत असल्याचा अंदाज आहे.


दरम्यान, हवामानाच्या माहितीनुसार उत्तर पाकिस्तान आणि उत्तर भारतात चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. दक्षिण भारतातील तमिळनाडू परिसरातही चक्रीय स्थिती असल्याचे सांगण्यात आले आहे. या बदलांमुळे काही भागांत वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात सध्या कमी दाबाचे क्षेत्र अथवा वादळाची स्थिती नसल्याचे दिलेल्या माहितीत नमूद आहे.


Tags: महाराष्ट्र हवामान, अवकाळी पाऊस, मुंबई हवामान, पावसाचा अंदाज, यलो अलर्ट, उष्णतेचा तडाखा, हवामान अपडेट

Comments
Add Comment

विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत सहकार मंत्र्यांची बैठक, ऊस उत्पादकांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयासाठी सरकार प्रयत्नशील

मुंबई: राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य शासन

महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला नवी झेप; ह्युंदाई मोटर प्रकल्पाचे पुण्यात दिमाखात उद्घाटन, मंत्री उदय सामंत काय म्हणाले?

पुणे :

Jayakumar Rawal : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सोयाबीन, तूर, उडदाला किती मिळणार हमीभाव? 950 खरेदी केंद्रे सज्ज

मुंबई : केंद्र शासनाच्या हमीभाव खरेदी योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2026-27 मध्ये सोयाबीन, मूग, उडीद व तूर खरेदीसाठी

दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांना सरकारचा दिलासा! परीक्षा शुल्काबाबत उच्च- तंत्र शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक दिलासा देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून

राज्यातील 304 तालुके दुष्काळग्रस्त घोषित; शेतकऱ्यांना मिळणार 12 सवलती!

राज्यातील ट्रिगर-1 आणि ट्रिगर-2 लागू झालेल्या एकूण 304 तालुक्यांना अंतिमतः दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहे. या

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! पुण्याच्या ईएसआयसी मेडिकल कॉलेजमध्ये 50 एमबीबीएस जागांना मंजुरी, मुख्यमंत्र्यांकडून खास 'नवरात्री भेट'

मुंबई : महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी