कन्या पूजन कसं कराल?
कन्या पूजन विधी खूप सोपा आणि साधा आहे. कन्यांना घरी बोलवून मोठ्या सन्मानाने आसनावर बसवलं जातं. त्यानंतर त्यांचे पाय धुवून, कपाळावर टिळा लावला जातो. तसेच हातावर मौली बांधली जाते. हलवा, चणे, पूरी आणि भाजी असं भोजन नैवेद्य दिला जातो. भोजन केल्यानंतर त्यांच्या पाया पडून देवी दुर्गेचं रूप म्हणून आशीर्वाद घेतले जातात. तसेच श्रद्धेनुसार त्यांना भेटवस्तू दिल्या जातात. मनापासून केलेल्या पूजनामुळे घरी सुख समृद्धी येते अशी भाविकांची मान्यता आहे. तसेच जीवनातील संकटं दूर होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि मुख्य सणांपैकी एक असलेल्या दुर्गापूजा (Durga Puja) उत्सवाला सुरुवात होत आहे. वाईटावर चांगल्याचा विजय आणि महिषासुराचा वध ...
पूजनासाठी कन्या मिळाल्या नाही तर..
नवरात्रीत कन्या पूजनासाठी कन्या मिळाल्या नाही तर चिंता करण्याचं कारण नाही. देवीला भक्तीभाव महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपल्या सुविधेनुसार विषम संख्येत कन्यांना आमंत्रित करू शकता. एक, तीन, पाच किंवा सात कन्यांचं पूजन करून व्रत पूर्ण करू शकता. फक्त एक कन्या जरी मिळाली तरी तिला देवी दुर्गेचं रुप मानून विधीवत पूजन करा. तीन, पाच आणि सात कन्या मिळाल्या तरी असंच पूजन करावं.
पण पूजन केल्यानंतर नऊ ताटांमध्ये भोजन वाढण्याचा शास्त्रानुसार नियम आहे. उपस्थित मुलींना भोजन दिल्यानंतर उर्वरित नऊ पैकी जी ताटं असतील ते भोजन देवीच्या मंदिरात अर्पण करा, गाईला खाऊ घाला किंवा गरजू व्यक्तीला वाटा. तसेच लहान मुलाची पूजा करायला विसरू नका. दरम्यान, खऱ्या मनाने आणि भक्तीने केलेला छोटासा प्रयत्नदेखील देवीला प्रसन्न करतो, असं मानलं जातं.