Healthy lifestyle tips: जेवणानंतरची छोटीशी चाल ठरू शकते फायदेशीर; साखर नियंत्रणासाठी काय सांगतात तज्ज्ञ?

महाराष्टात १०.९ लाख लोकांना हाय शुगरचा त्रास, जाणून घ्या काय करायचे..

आजकालच्या जगात माणसाला वेगवेगळ्या जीवघेण्या आजारांना सामोरे जावे लागते. महाराष्ट्रात 10.9 लाख लोकांना हाय शुगरचा (डायबीटीज) त्रास. धावपळीच्या जीवनात अनेकजण जेवण झालयानंतर लगेच झोपतात किंवा आराम करतात. मात्र, जेवणानंतर काही मिनिटं हलक्या गतीने चालण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. विशेषतः रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी जेवणानंतर चालणं उपयुक्त ठरू शकते. मग जेवणानंतर किती वेळ चालावं आणि त्याचे नेमके फायदे काय आहेत? जाणून घेऊया...




जेवल्यानंतर किती वेळ चालणे गरजेचे असते?


जेवणानंतर चालल्याने शरीराला खूप फायदा होतो. कारण जेवल्यानंतर  शरीरातील शुगर लेव्हल वाढते, ज्याला तुम्ही चालून कंट्रोलमध्ये आणू शकता.
जेवणानंतर 15 ते 20 मिनिटांनी चालणे फायद्याचे असते. याच्यासाठी खूप वेगाने चालण्याची किंवा एक्सरसाईज करण्याची गरज नाही. आरामात चालल्याने देखील फायदा होतो. खरतर जेवल्यानंतर शरीरात ब्लड शुगरची पातळी वाढलेली असते. या दरम्यान चालण्याने शुगर लेव्हल कमी होण्यास मदत होते.(HEALTHY LIFESTYLE)





वेगाने चालणे आणि हेव्ही वर्कआऊट करणे का टाळले पाहिजे?


जेवल्यानंतर अचानक खूप वेगाने चालणे किंवा हेव्ही वर्कआऊट करणे योग्य नाही. जर चालताना छातीत वेदना होता असतील किंवा चक्कर, असामान्यपणे दम लागणे अशा समस्या होत असतील तर थांबा आणि गरज लागण्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचे असते. जर तुम्ही हार्टचे रुग्ण असाल किंवा तुम्हाला खूप आधीपासूनच गंभीर आजार असतील तर वॉक आणि एक्सरसाईजच्या योग्य पद्धती आणि वेळ जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप गरजेचे असते.(LIFESTYLE TIPS)





रोज 30 ते 35 मिनिटांचा वॉक का करावा?


रोज 30 ते 35 मिनिटे चालणं खूप गरजेचे असते. यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते, वजन कमी होण्यास मदत होते, हृदयविकाराचे आजार कमी होण्यास मदत होते. यासाठी नियमित झोप आणि चांगला आहार सुद्धा तितकाच महत्वाचा असतो. तुमचा डॉक्टरांकडून वेळच्यावेळी सल्ला घेणेही तितकेच गरजेचे असते.


(टीप: प्रस्तुत लेखात दिलेली माहिती ही वाचकांच्या ज्ञानवर्धनासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचे मार्गदर्शन अवश्य घ्यावे. यातील कोणत्याही दाव्यांची अथवा तथ्यांची पुष्टी 'प्रहार' करत नाही.)

Comments
Add Comment

Nashik: नाशिकच्या 'या' भागात उद्या वीजपुरवठा बंद

नाशिक शहरातील महावितरणच्या पाथर्डी विद्युत उपकेंद्रात तातडीच्या देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात येणार

Ranji Trophy Elite 2026-27: मुंबईची हिमाचल प्रदेशवर सरशी, सरफराज खान ठरला विजयाचा हिरो

रणजी ट्रॉफी 2026-27 स्पर्धेचं पर्व सुरू आहे. या स्पर्धेत मुंबई आणि हिमाचल प्रदेश हे संघ आमनेसामने आले होते. या

इंटरनेटच्या सुरक्षेला मोठा धोका! eMudhra च्या 8 डिजिटल प्रमाणपत्रांमध्ये गंभीर त्रुटी

जेव्हा आपण ऑनलाईन एखादी वेबसाईट उघडतो आणि त्यावर https किंवा लॉकचे चिन्ह असेल तेव्हा ती सुरक्षित आहे असे आपण गृहीत

Maharashtra Politics News : उसनवारी नियुक्त्यांना चाप लावल्यानंतर मंत्री कार्यालयांत ‘सावधि’ पदांना मंजुरी!

मुंबई : मंत्री कार्यालयांतील उसनवारी आणि मौखिक नियुक्त्यांना चाप लावल्यानंतर निर्माण झालेली मनुष्यबळाची

Ravan Dahan 2026 : आतषबाजीने आसमंत उजळला; ढोल-ताशांचा निनाद, घोड्यांचा ठेका अन्‌ नेत्रदीपक आतषबाजी

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : विजयादशमी निमित्त एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुकामाता देवस्थान ट्रस्टच्या वतीने

Orangutan rescue Odisha : ओडिशातून तस्करीत सापडलेली ५ ओरंगउटान पिल्ले लवकरच परतणार मायदेशी!

चेन्नई : इंडोनेशियाच्या (Indonesia) जंगलांतून बेकायदेशीरपणे तस्करी करून भारतात आणलेली पाच गोंडस ओरंगउटानची (Orangutans)