
मुंबई: मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी माध्यमांसमोर ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपची सत्यता तपासून तिची सखोल चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे नेते आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी गुरुवारी केली. या क्लिपमध्ये करण्यात आलेला दावा १०० टक्के खोटा असून, त्यात भाजपच्या कोणत्याही नेत्याचा आवाज नाही, असा दावाही त्यांनी केला. तसेच, महायुतीचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणे भाजपला मान्य नसल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले.
मुंबई: सौर ऊर्जेचा प्रभावी वापर वाढविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पावले उचलली आहेत. त्याचाच भाग म्हणून पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या ...
जरांगे यांनी संबंधित ऑडिओ क्लिप सार्वजनिक केल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही त्यातील उल्लेखांची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना शेलार यांनी क्लिप बाहेर आली कशी, तिची सत्यता किती आहे आणि ती तयार करताना तंत्रज्ञानाचा वापर झाला आहे का, याची तपासणी होणे आवश्यक असल्याचे सांगितले. ही क्लिप चुकीच्या किंवा अवैध पद्धतीने तयार करण्यात आली आहे का, ती आताच सार्वजनिक करण्यामागे काय कारण आहे आणि जरांगे यांच्यापर्यंत ती कशी पोहोचली, या प्रश्नांची उत्तरेही शोधली पाहिजेत, असे ते म्हणाले.
मुंबई: सासवड नगरपालिकेतील 230 कंत्राटी कामगारांना किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी (पीएफ), कर्मचारी राज्य विमा (ईएसआय) आणि अन्य वैधानिक लाभ मिळत आहेत किंवा ...
‘ज्या ऑडिओ क्लिपची सत्यता अद्याप निश्चित झालेली नाही, तिच्या समर्थनार्थ कोणताही पूरक पुरावा समोर आलेला नाही, त्या क्लिपच्या आधारे निष्कर्ष काढता येणार नाही. क्लिपमधील तथाकथित चर्चेशी भाजप सहमत नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, हीच आमची भूमिका आहे,’ असे शेलार यांनी स्पष्ट केले. जरांगे यांच्याकडे या प्रकरणासंदर्भात जे काही पुरावे असतील, ते त्यांनी तपास यंत्रणांकडे द्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले. उदय सामंत यांच्या विधानाबाबत बोलताना शेलार यांनी त्यांचा गैरसमज झाला असावा, असे म्हटले. ‘क्लिपची सत्यता पडताळलेली नसताना आणि त्याला पूरक पुरावा नसताना त्यावरून निष्कर्ष काढणे योग्य नाही. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार होणाऱ्या अशा सामग्रीची सत्यता पुराव्यांच्या आधारे तपासावी लागते. उदय सामंत यांचा गैरसमज झाला असेल, तर तो दूर करू. मित्रपक्षांमधील गैरसमजही दूर केले जातील,’ असे त्यांनी सांगितले.



