Thursday, October 22, 2026

Healthy Lifestyle : तुम्हाला ही रात्रभर झोपूनही सकाळी थकवा जाणवतो? जाणून घ्या 5 महत्त्वाची कारणे

1/5 झोपेची गुणवत्ता चांगली नसणे: रात्री 7 ते 9 तास झोप घेतली, तरी झोप वारंवार मोडत असेल तर सकाळी थकवा जाणवू शकतो. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरणे, खोलीत जास्त प्रकाश किंवा आवाज असणे यामुळे झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. 
2/5 शरीरात पोषक घटकांची कमतरता : शरीराला पुरेसे पोषण मिळाले नाही, तर अशक्तपणा आणि थकवा जाणवू शकतो. लोहाची कमतरता, व्हिटॅमिन बी12 किंवा इतर पोषक घटकांची कमतरता यामागे असू शकते. संतुलित आहार घ्या आणि गरज भासल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी करा. 3/5 मानसिक तणाव आणि चिंता :  कामाचा ताण, कौटुंबिक समस्या किंवा सततच्या चिंता यांचा झोपेवर परिणाम होऊ शकतो. शरीर झोपलेले असले, तरी मन अस्वस्थ असल्यामुळे सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटत नाही. नियमित व्यायाम, ध्यान आणि झोपण्यापूर्वी शांत दिनक्रम यामुळे मदत होऊ शकते. 4/5 झोपण्याच्या वेळेत नियमितता नसणे :  दररोज वेगवेगळ्या वेळी झोपणे आणि उठणे यामुळे शरीराचे नैसर्गिक झोपेचे चक्र बिघडू शकते. रात्री उशिरापर्यंत जागरण करणे आणि सुट्टीच्या दिवशी खूप उशिरा उठणे याचाही परिणाम होऊ शकतो. शक्यतो दररोज एकाच वेळी झोपण्याची आणि उठण्याची सवय लावा. 5/5 काही आरोग्यविषयक समस्या:  स्लीप ॲपनिया, थायरॉईडचे विकार, मधुमेह किंवा रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरता यांसारख्या समस्यांमुळेही पुरेशी झोप घेऊन थकवा जाणवू शकतो. मोठ्याने घोरणे, झोपेत श्वास थांबल्यासारखे होणे किंवा दिवसभर प्रचंड झोप येणे अशी लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

महत्त्वाचे : पुरेशी झोप घेऊनही दररोज थकवा जाणवत असेल किंवा त्यासोबत चक्कर, धाप लागणे अथवा अशक्तपणा असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण शोधण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >