BMC Water Facilities : मुंबईतील सर्व पाणपोईंची माहिती सादर करा, स्थायी समिती अध्यक्षांनी दिले प्रशासनाला निर्देश

त्यामुळे हा प्रस्ताव फेरविचारासाठी पाठवून मुंबईतील एकूण पाणपोई आणि त्यातील किती पाणपोई वापरात आहेत याची माहितीसह हा प्रस्ताव सादर केला जावा असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिले आहेत.

मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबईत वाढत्या उष्म्यामुळे घामाची लाही लाही होत असून यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रत्येक ठिकाणी पाणपोईंच्या माध्यमातून करणे ही आवश्यक आहे. याबाबत नगरसेवकाने मांडलेल्या सूचनांबाबत प्रशासनाने कोणत्याही प्रकारची माहिती न देता आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हा प्रस्ताव फेरविचारासाठी पाठवून मुंबईतील एकूण पाणपोई आणि त्यातील किती पाणपोई वापरात आहेत याची माहितीसह हा प्रस्ताव सादर केला जावा असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिले आहेत.



मुंबईतील रेल्वे स्थानक, बस थांबे, बाजारपेठा, रुग्णालये, उद्याने, चौक आदी ठिकाणी जलशुध्दीकरण यंत्रणा बसवलेले प्याऊ उभारण्यात यावेत तसेच ब्रिटीशकालिन प्याऊ पुन्हा वापरात आणले जावे अशी मागणी भाजप नगरसेविका रिटा मकवाना यांनी केली होती. यावर ब्रिटीशकालिन प्याऊंचा पुन्हा वापर करण्याची बाब जलअभियंता विभागाशी निगडीत नाही तसेच यासाठी महापालिकेच्यावतीने जलजोडणी दिली जाते असे सांगितले. यामिनी जाधव यांनी ही मागणी योग्य असून असे जलशुध्दीकण यंत्रणा असलेले प्याऊ बनवलेच गेले पाहिजे असे सांगितले. तर याचे उत्तर योग्य नसून हा प्रस्ताव फेरविचारासाठी पाठवण्याची मागणी डॉ सईदा खान यांनी केली. तर किल्लेदार यांनी सदस्याने विचारलेल्या मागणीनुसार यामाहिती यायला हवी होती असे सांगितले तर तेजिंदर सिंग तिवाना यांनी ब्रिटीशकालिन १७ प्याऊ पुन्हा वापरात आणण्यासाठी १५ कोटी रुपये खर्च केले जाणार होते. त्यानुसार किती प्याऊ वापरात आले आहेत याची माहिती मागितली. तर ऍड मकरंद नार्वेकर यांनी मुंबईत २८३० प्याऊ असून ब्रिटीशकालिन प्याऊंपैंकी एक प्याऊ मेट्रो सिनेमा समोर आहे. त्याचे काम झाले आहे, परंतु अद्यापही ते सुरु केले जात नसल्याचे सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत मिनाक्षी पाटणकर, शीतल गंभीर, प्रकाश दरेकर,तुलिफ मिरांडा आदींनी भाग घेतला होता.

Comments
Add Comment

BMC Fixed Deposits : महापालिकेच्या मुदत ठेवींच्या मुद्द्यावरून थेट पक्षांतरवर घसरले नगरसेवक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेतील मुदतठेवींमधील रक्कम कमी होत असल्याने याबाबत चिंता व्यक्त करत

BMC News : मुंबईतील सर्वच बॅनर गुरुवारपर्यंत साफ करून टाका, स्थायी समितीने केली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत प्लेक्समुक्त करण्याची घोषणा महापौरांनी केल्यानंतर त्यांनी स्वत: च्या

Demolition Rules Mumbai : इमारत पाडकामांमध्ये महापालिकेचे होते दुर्लक्ष, मुंबईत धुळीचे वातावरण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील वाढत्या प्रदुषणाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा तीव्र चिंता व्यक्त केली जात

Bhatsa Dam Water Level : भातसा धरणातील पाणीसाठ्यात तफावत, दहा दिवसांत तब्बल २४ टक्क्यांनी घटला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत भातसा धरणातील

BMC News: आग, अपघात, झाड कोसळल्यास संपर्कासाठी मुंबई फायर ब्रिगेडचे पर्यायी नंबर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील नागरिकांना आग, इमारत कोसळणे, अपघात, झाडे उन्मळून पडणे, पाण्यात बुडण्याच्या घटना

मुंबईत तीन ठिकाणी फुटणार आता वाहतूक कोंडी; तीन उड्डाणपुलांचे लोकार्पण गुरुवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुंबईच्या