Nashik : नाशिककरांनो लक्ष द्या ! 'या' दिवशी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद

प्रस्तावित कामे पूर्ण करण्यासाठी सुमारे १२ ते १८ तासांचा कालावधी आवश्यक आहे. त्यामुळे शनिवारी दिवसभर शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

नाशिक : शहरातील जलवाहिन्यांची गळती रोखणे, व्हॉल्व्हची दुरुस्ती आणि पाणीपुरवठा व्यवस्थेतील महत्त्वाची कामे करण्यासाठी शनिवारी, २४ ऑक्टोबर रोजी संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या देखभाल व दुरुस्तीच्या कामांमुळे रविवारी सकाळी पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता असून, नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.



शहरातील १२ ठिकाणी दुरुस्तीची कामे


नाशिक शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी विविध ठिकाणी दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. सातपूर, नवीन नाशिक, नाशिक पश्चिम, नाशिकरोड, पंचवटी आणि नाशिक पूर्व या सहाही विभागांमध्ये सुमारे १२ ठिकाणी कामे प्रस्तावित आहेत. यामध्ये मुख्य जलवाहिन्यांमधील गळती थांबवणे, जलकुंभाची वितरण वाहिनी अस्तित्वातील जलवाहिनीला जोडणे, नवीन व्हॉल्व्ह बसविणे आणि क्रॉस कनेक्शनची कामे करण्यात येणार आहेत. यातील काही कामे गेल्या दीड महिन्यापासून प्रलंबित आहेत. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या काळात संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवणे शक्य नसल्याने ही कामे पुढे ढकलण्यात आली होती. आता दिवाळीपूर्वी पाणीपुरवठा यंत्रणेतील त्रुटी दूर करण्यासाठी महापालिकेने दुरुस्तीचे नियोजन केले आहे.



१२ ते १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद


प्रस्तावित कामे पूर्ण करण्यासाठी सुमारे १२ ते १८ तासांचा कालावधी आवश्यक आहे. त्यामुळे शनिवारी दिवसभर शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतरही पाणीपुरवठा पूर्ववत होण्यासाठी काही वेळ लागू शकतो. त्यामुळे रविवारी सकाळी कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता आहे. नागरिकांनी शनिवारी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.



१० टक्के पाणीकपातीचा निर्णय अद्याप प्रलंबित


दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाने १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, नाशिक महानगरपालिकेने अद्याप पाणीकपातीचा निर्णय घेतलेला नाही. पाणी आरक्षण निश्चित झाल्यानंतरच कपातीबाबत निर्णय घेण्याची भूमिका महापालिकेने घेतली आहे. पाणी आरक्षणाचा निर्णय पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून घेतला जातो. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा विभागासह कुंभमेळ्याची जबाबदारीही आहे. दरम्यान, महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी शासनाच्या निर्देशांनुसार पाणीकपात करावी लागू शकते, असे संकेत दिले होते. मात्र, प्रत्यक्षात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.


नाशिककरांसाठी महत्त्वाचे : शनिवारी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने घरगुती वापरासाठी आवश्यक पाणीसाठा आधीच करून ठेवावा. रविवारी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता लक्षात घेऊन पाण्याचे नियोजन करावे.

Comments
Add Comment

Bunty Dixit Murder : 'दोस्त की दुश्मन?' आधी कारने उडवले, मग रॉडने ठेचून हत्या; छत्रपती संभाजीनगरमधील भयानक हत्याकांड

Crime News: छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको एन-7 परिसरात गुरुवारी दिवसाढवळ्या एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली.

Delhi-NCR Air Pollution : दिल्ली-NCR मधील प्रदूषण रोखण्यासाठी CAQM अ‍ॅक्शन मोडमध्ये ! पंजाब-हरियाणाला पराली जाळण्यावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश

Delhi-NCR Air Pollution : हिवाळ्यात दिल्ली-NCR परिसरातील वायुप्रदूषणात होणारी वाढ रोखण्यासाठी वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने

Cancer Medicine Price: कॅन्सरची औषधे स्वस्त होणार ? केंद्र सरकारचा 30% ट्रेड मार्जिनचा प्रस्ताव

Cancer Medicine Price Reduction : कर्करोगावरील उपचारांचा खर्च दिवसेंदिवस वाढत असल्याने रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठ्या

Devendra Fadnavis : मुंबईकरांचे जीवन अधिक सुलभ करणे हेच पायाभूत सुविधा विकासाचे उद्दिष्ट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईला जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा असलेले आधुनिक आणि भविष्यासाठी सज्ज महानगर

OnePlus Upcoming Smartphone : 200MP कॅमेरा, 10,000mAh पर्यंतची बॅटरी अन् 185Hz डिस्प्ले ! OnePlus चा नवा स्मार्टफोन लवकरच येणार ?

OnePlus Upcoming Smartphone : स्मार्टफोन बाजारात आपली पकड मजबूत करण्यासाठी OnePlus एका नव्या स्मार्टफोनवर काम करत असल्याची चर्चा आहे.

Jailer 2 Box Office Collection: रजनीकांत यांच्या ‘जेलर 2’ची जगभरात धूम ! दृश्यम 3’ला टाकले मागे, 7 दिवसांत 'इतक्या' कोटींची कमाई

Jailer 2 Worldwide Box Office Collection : सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘जेलर 2’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार चर्चा सुरू आहे.