Bunty Dixit Murder : 'दोस्त की दुश्मन?' आधी कारने उडवले, मग रॉडने ठेचून हत्या; छत्रपती संभाजीनगरमधील भयानक हत्याकांड

कारने त्यांच्या स्कुटीला धडक दिल्यानंतर लोखंडी रॉडने त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे

Crime News: छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको एन-7 परिसरात गुरुवारी दिवसाढवळ्या एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. देवेश चंद्रेश दीक्षित ऊर्फ बंटी दीक्षित (वय 35) यांच्यावर बजरंग चौकातील वर्दळीच्या रस्त्यावर हल्ला करण्यात आला. कारने त्यांच्या स्कुटीला धडक दिल्यानंतर लोखंडी रॉडने त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत बंटी दीक्षित यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात पवन पराशर याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.



कारने धडक दिल्यानंतर लोखंडी रॉडने हल्ला


मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बंटी दीक्षित हे स्कुटीवरून जात असताना एका कारने त्यांच्या स्कुटीला मागून धडक दिली. धडकेमुळे ते रस्त्यावर पडले. त्यानंतर कारमधून उतरलेल्या व्यक्तीने लोखंडी रॉडने त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात बंटी दीक्षित यांचा जागीच मृत्यू झाला.



मित्रासोबत वाद झाल्याची माहिती


बंटी दीक्षित आणि पवन पराशर यांच्यात घटनेपूर्वी वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. बंटी हे जिममधून परतत असताना एका पानटपरीजवळ दोघांची भेट झाली आणि त्यांच्यात वाद झाल्याचे वृत्त आहे. त्यानंतर बंटी स्कुटीवरून घराच्या दिशेने निघाले. मात्र, बजरंग चौकात त्यांच्यावर पुन्हा हल्ला झाल्याची माहिती दिली जात आहे.


या हत्येमागे व्यावसायिक वाद असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांच्या तपासानंतरच या घटनेमागील कारण समोर येणार आहे.





‘फेसबुक किंग’ म्हणून होती ओळख


बंटी दीक्षित यांची काही वर्षांपूर्वी शहरात ‘फेसबुक किंग’ म्हणून ओळख होती. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर केल्यामुळे त्यांना लोकप्रियता मिळाली होती. ते मेस चालवण्यासोबतच प्लॉटिंगच्या व्यवसायातही सक्रिय होते. तसेच सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग असल्याचे सांगितले जाते.



पोलिसांकडून तपास सुरू


घटनेची माहिती मिळताच सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले. बंटी दीक्षित यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. संबंधित कारमधून चाकू आणि लोखंडी रॉड जप्त केल्याची माहिती आहे.


या प्रकरणात पवन पराशर याला ताब्यात घेतल्याचे वृत्त असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर शहरात खळबळ उडाली आहे.


Comments
Add Comment

India china border dispute : अरुणाचल सीमेवर भारत-चीन गतिरोध कायम, आयटीबीपी प्रमुखांचा मोठा खुलासा!

नवी दिल्ली : भारत आणि चीनच्या सीमेवर अद्यापही तणावाचे वातावरण कायम असल्याची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

Delhi-NCR Air Pollution : दिल्ली-NCR मधील प्रदूषण रोखण्यासाठी CAQM अ‍ॅक्शन मोडमध्ये ! पंजाब-हरियाणाला पराली जाळण्यावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश

Delhi-NCR Air Pollution : हिवाळ्यात दिल्ली-NCR परिसरातील वायुप्रदूषणात होणारी वाढ रोखण्यासाठी वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने

Cancer Medicine Price: कॅन्सरची औषधे स्वस्त होणार ? केंद्र सरकारचा 30% ट्रेड मार्जिनचा प्रस्ताव

Cancer Medicine Price Reduction : कर्करोगावरील उपचारांचा खर्च दिवसेंदिवस वाढत असल्याने रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठ्या

Devendra Fadnavis : मुंबईकरांचे जीवन अधिक सुलभ करणे हेच पायाभूत सुविधा विकासाचे उद्दिष्ट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईला जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा असलेले आधुनिक आणि भविष्यासाठी सज्ज महानगर

OnePlus Upcoming Smartphone : 200MP कॅमेरा, 10,000mAh पर्यंतची बॅटरी अन् 185Hz डिस्प्ले ! OnePlus चा नवा स्मार्टफोन लवकरच येणार ?

OnePlus Upcoming Smartphone : स्मार्टफोन बाजारात आपली पकड मजबूत करण्यासाठी OnePlus एका नव्या स्मार्टफोनवर काम करत असल्याची चर्चा आहे.

Jailer 2 Box Office Collection: रजनीकांत यांच्या ‘जेलर 2’ची जगभरात धूम ! दृश्यम 3’ला टाकले मागे, 7 दिवसांत 'इतक्या' कोटींची कमाई

Jailer 2 Worldwide Box Office Collection : सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘जेलर 2’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार चर्चा सुरू आहे.