Friday, October 23, 2026

Nashik: नाशिकच्या ' या ' भागात उद्या वीजपुरवठा बंद

नाशिक: नाशिक शहरातील महावितरणच्या उपनगर विद्युत उपकेंद्रातील विद्युत वाहिनीवर तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने शनिवार दि. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत उपनगर विद्युत उपकेंद्रातून निघणाऱ्या नाशिक रोड या विद्युत वाहिनीवरील वीज पुरवठा टप्याटप्याने बंद राहणार आहे. यामध्ये खालील परिसरातील वीजपुरवठा प्रभावित राहील. नाशिक-पुणे रोड, उपनगर पोलीस स्टेशन परिसर, आयएसपी गेट, जय भवानी रोड, डावखरवाडी, शिखरेवाडी, प्रधान नगर, दत्त मंदिर सिग्नल परिसर, टारझन मॉल आणि ढोबळे नगर या भागातील टप्याटप्याने वीजपुरवठा बंद राहणार आहे. देखभाल व दुरुस्तीचे काम नियोजित वेळेपूर्वी पूर्ण झाल्यास वीजपुरवठा त्यापूर्वीच सुरू करण्यात येईल. संबंधित वीज ग्राहकांनी याची नोंद घेऊन महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ कडून करण्यात आले आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >