Saturday, October 24, 2026

Dadar : दादर मधील फुल मंडई आणि सेनापती बापट मार्ग मार्गावरील 12 अनधिकृत बांधकामांवर कारवाई

महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनात, पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमणे तत्काळ हटवून पदपथ अडथळामुक्त करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून 'पेडेस्ट्रियन फर्स्ट' अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

पदपथांवर पादचाऱ्यांना सुलभपणे मार्गक्रमण करता यावे, यासाठी महानगरपालिकेकडून ‘पादचारी प्रथम’ अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत, दादर पश्चिम येथील स्व. माँसाहेब मीनाताई ठाकरे फुल मंडई आणि सेनापती बापट मार्गालगतच्या पदपथावर अडथळा निर्माण करणारी १२ अनधिकृत बांधकामे, तात्पुरते ताडपत्रीचे शेड, अनधिकृत कट्टे आणि ६० फेरीवाल्यांवर शुक्रवारी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी हटवण्यात आले. निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनात, पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमणे तत्काळ हटवून पदपथ अडथळामुक्त करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून 'पेडेस्ट्रियन फर्स्ट' अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी उत्तर’ विभागाकडून ही कारवाई करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर, उपायुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त (जी उत्तर विभाग) योगेश देसाई यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या कारवाईत दादर येथील स्व. माँसाहेब मीनाताई ठाकरे फुल बाजार आणि सेनापती बापट मार्गालगतच्या पदपथावर अडथळा निर्माण करणारी १२ अनधिकृत बांधकामे, तात्पुरते ताडपत्रीचे शेड, अनधिकृत कट्टे आणि ६० फेरीवाल्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. यावेळी, पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात होता.

दरम्यान, पादचाऱ्यांसाठी सुलभ पदपथ उपलब्ध करुन देण्यासाठी महानगरपालिकेकडून उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे, पदपथांवर अडथळा निर्माण होईल, असे अनधिकृत बांधकाम करू नये अथवा साहित्य ठेवू नयेत. असे निदर्शनास आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >