Flax seeds and chia seeds: छोट्या बियांमध्ये मोठे गुण! चिया सीड्स आणि फ्लॅक्स सीड्स का आहेत खास?

Flax seeds and chia seeds health benefits: रोजच्या आहारात समावेश करा या दोन बियांचा; शरीराला मिळतील महत्त्वाचे पोषक घटक

चिया सीड्स आणि फ्लेक्स सीड्स हे दोन्ही अत्यंत पौष्टिक सुपरफूड्स आहेत, पण त्यांच्यात काही महत्त्वाचे फरक आणि स्वतःचे असे वेगळे महत्त्व आहे. चिया सीड्स हे आकाराने खूप लहान, गोल आणि काळ्या-पांढऱ्या रंगाचे असतात. जेव्हा हे सीड्स पाण्यात भिजवले जातात, तेव्हा ते स्वतःच्या वजनापेक्षा 12 पटीने जास्त पाणी शोषून घेतात आणि जेलीसारखे बनतात. चिया सीड्स तुम्ही न दळता थेट खाऊ शकता, कारण आपले शरीर ते सहज पचवू शकते. फ्लॅक्स सीड्स हे आकाराने थोडे मोठे, चपटे आणि तपकिरी किंवा सोनेरी रंगाचे असतात. फ्लॅक्स सीड्सची चव थोडी वेगळी असते. सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे फ्लॅक्स सीड्स नेहमी दळन किंवा पूड करून खावे लागतात; जर ते संपूर्ण अख्खे खाल्ले, तर ते न पचता शरीराबाहेर पडतात आणि त्यांचे पोषण शरीराला मिळत नाही. पोषक तत्वांचा विचार केला तर चिया सीड्समध्ये कॅल्शियम, फायबर आणि फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते, तर फ्लॅक्स सीड्समध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड आणि लिग्नन्स नावाचे अँटी-ऑक्सिडंट्स थोडे जास्त प्रमाणात आढळतात.


दोन्ही सीड्सचे आरोग्यदायी, काय आहे महत्त्व:


• हृदयाचे आरोग्य आणि ओमेगा-3: दोन्ही सीड्समध्ये 'अल्फा-लिनोलेनिक ॲसिड' हे वनस्पती-आधारित ओमेगा-३ फॅटी ॲसिड भरपूर असते. हे फॅटी ॲसिड शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास, रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि हृदयाचे आजार रोखण्यास मदत करते.(HEALTH BENEFIT)

• पचनक्रिया आणि वजन नियंत्रण: चिया सीड्समध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. पाण्यात भिजवल्यानंतर ते पोटात गेल्यावर जास्त वेळ भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजन कमी करण्यास मदत होते. फ्लॅक्स सीड्समधील फायबर देखील पचन सुधारून बद्धकोष्टतेचा त्रास दूर करते.

• कॅन्सरपासून संरक्षण आणि हार्मोन्स संतुलन: फ्लॅक्स सीड्समध्ये 'लिग्नन्स' नावाचे अँटी-ऑक्सिडंट्स चिया सीड्सपेक्षा खूप जास्त असतात, जे शरीरातील हार्मोन्स संतुलित ठेवतात (विशेषतः महिलांमध्ये PCOD/PCOS साठी फायदेशीर) आणि कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत करतात.

• हाडांची मजबुती: चिया सीड्समध्ये फ्लॅक्स सीड्सपेक्षा दुप्पट ते तिप्पट जास्त कॅल्शियम असते, ज्यामुळे हाडे आणि दात मजबूत राहण्यासाठी चिया सीड्स अत्यंत महत्त्वाचे मानले जातात.


चिया सीड्स आणि फ्लेक्स सीड्स रोजच्या जीवनात  कसा करायचा वापर


चिया सीड्स आणि फ्लेक्स सीड्स या दोन्हींमध्ये फायबर असतात. विशेषतः विरघळणारे फायबर शरीरातील खराब कोलेस्टेरॉला नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकते. फ्लेक्स सीड्समुळे कोलेस्टेरॉल आणि रक्तदाबामध्ये थोडी सुधारणा झाल्याले दिसून आले. चिया सीड्सवरही संशोधन झाले आहे. तुम्ही तुमच्या आहारात रोज 1 ते 2 चमचे या दोन्हीपैकी कोणत्याही एका सीड्सचा किंवा दोन्हीचा आलटून-पालटून समावेश करू शकता. चिया सीड्स स्मूदी, पुडिंग किंवा पाण्यात भिजवून खावेत आणि फ्लॅक्स सीड्सची ताक, दही किंवा चपातीच्या पिठात मिक्स करून खावी.

 

 
Comments
Add Comment

Healthy lifestyle tips: जेवणानंतरची छोटीशी चाल ठरू शकते फायदेशीर; साखर नियंत्रणासाठी काय सांगतात तज्ज्ञ?

आजकालच्या जगात माणसाला वेगवेगळ्या जीवघेण्या आजारांना सामोरे जावे लागते. महाराष्ट्रात 10.9 लाख लोकांना हाय शुगरचा

important and practical life: ताटात लोणचं असेल तर जेवणाची चव दुप्पट! पण फायदे काय?

[caption id="attachment_1067987" align="alignnone" width="850"] जेवणाची रंगत वाढावी म्हणून अनेकदा ताटात डाव्या बाजूला लोणचं, चटणी असं चटपटीत काहीतरी

Vegetable storage tips in fridge: तुमचा भाज्या फ्रिजमध्ये ठेऊन सुद्धा खराब होतायत का? जाणून घ्या टिप्स

[caption id="attachment_1067602" align="alignnone" width="850"] कोथिंबीर, मेथी, पालक आणि इतर हिरव्या भाज्या घरी रोजच्या स्वयंपाकासाठी वापरलया जातात. पण

Skin Treatment : सणासुदीच्या काळात त्वचेला ग्लो देण्यासाठी 5 खास स्किन ट्रीटमेंट्स; जाणून घ्या कधी कराव्यात?

दिवाळीत त्वचेवर नैसर्गिक चमक आणि ग्लो मिळवण्यासाठी सणांच्या काही दिवस आधी योग्य स्किन ट्रीटमेंट्स घेणे

नवरा-बायको दोघेही कमावतात, तरी बचत शून्य? ‘या’ ४ चुका ठरतात कारणीभूत!

घरात नवरा बायको दोघेही कामाला जातायंत पण तरीदेखील महिन्याच्या शेवटी बचत होत नाहीय? याचं कारण फक्त जास्त खर्च

Legal Will: मृत्यूपत्र कसे बनवायचे? किती खर्च येतो, काय आहेत नियम? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप...

मुंबई: सध्याच्या घडीला माणसाचा एका मिनिटाचाही भरोसा नाही. आयुष्यात काय अनपेक्षित घडेल हे कोणालाच माहीत नाही.