भुवनेश्वर कुमारच्या समोरच अर्शदीप सिंगने त्याचा विक्रम मोडला, नेमकं काय झालं? वाचा
भारताने न्यूझीलंडला दुसऱ्या टी20 सामन्यात 1 चेंडू आणि 4 गडी राखून पराभूत केलं. या सामन्यात अर्शदीप सिंगने दोन विकेट काढल्या. या दोन विकेट विक्रमी ठरला.
October 24, 2026 05:21 PM
1/5 न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात डावखुऱ्या वेगवा गोलंदाज अर्शदीप सिंगने विक्रम रचला. त्याने या सामन्यात दोन विकेट काढल्या आणि एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. (Photo: ANI)
2/5 अर्शदीप सिंगने 2026 या एकाच कॅलेंडर वर्षात 38 विकेट्स घेण्याचा टप्पा गाठला आहे. यासह भारतासाठी एका वर्षात टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा भुवनेश्वर कुमारचा (37 विकेट्स, 2022) विक्रम मोडीत काढला आहे. (Photo: ANI)
3/5 अर्शदीप सिंगने ग्लेन फिलिप्सची विकेट काढली आणि विक्रम नावावर केला. या वर्षातील अर्शदीप सिंगची टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 38वी विकेट होती. यासह त्याने भुवनेश्वर कुमारला मागे टाकलं. (Photo: ANI)
4/5 अर्शदीप सिंगने 2026 मध्ये 38 विकेट काढल्या. भुवनेश्वर कुमारने 2022 मध्ये 37 विकेट काढल्या होत्या. खरं तर हा विक्रम अर्शदीपने 2024 मध्येच मोडला असता, पण त्याना 36 विकेटवर समाधान मानावं लागलं. वरुण चक्रवर्तीने 2025 मध्ये 36 विकेट काढल्या. 2022 मध्ये अर्शदीपने 22 विकेट, तर 2026 मध्ये अक्षर पटेलने 32 विकेट काढल्या. (Photo: ANI)
5/5 अर्शदीप सिंग एका वर्षात सर्वाधिक टी20 विकेट्स घेणाऱ्या जागतिक गोलंदाजांच्या यादीत संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. श्रीलंकेच्या वानिंदु हसरंगाने 38 विकेट घेतल्या आहे. आयर्लंडचा जोश लिटल 39 विकेट्ससह पहिल्या स्थानावर आहे. (Photo: ANI)