अल्पसंख्याकांच्या हक्कांवरून भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानला फटकारले; 'सेन्याचे हुकूम बजावण्यापेक्षा स्वतःच्या जनतेच्या कल्याणावर लक्ष द्या'

संयुक्त राष्ट्र महासभेच्या तिसऱ्या समितीतील चर्चेदरम्यान भारताने पाकिस्तानच्या अल्पसंख्याक हक्कांवरील भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. भारताचे प्रथम सचिव रघू पुरी यांनी पाकिस्तानला स्वतःच्या नागरिकांच्या कल्याणावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. जम्मू-काश्मीरबाबतही भारताने आपली भूमिका पुन्हा स्पष्ट केली.

नवी दिल्ली: संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) तिसऱ्या समितीमधील एका संवादात्मक चर्चेदरम्यान भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा पर्दाफाश केला आहे. पाकिस्तान स्वतःच्याच नागरिकांचे रक्षण करण्यात अपयशी ठरत असताना आंतरराष्ट्रीय मंचाचा गैरवापर करत असल्याचा जोरदार प्रहार भारताने केला आहे. तसेच जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून पाकिस्तानने आपल्या बेकायदेशीर ताब्यातील सर्व भाग रिकामा करावा, अशी स्पष्ट मागणी भारताने केली आहे.



आंतरराष्ट्रीय मंचाचा गैरवापर


संयुक्त राष्ट्र महासभेच्या तिसऱ्या समितीमध्ये अल्पसंख्याक मुद्द्यांवरील विशेष प्रतिनिधींसोबत झालेल्या संवादात्मक चर्चेत भारताच्या स्थायी मिशनचे प्रथम सचिव, रघु पुरी यांनी पाकिस्तानच्या भूमिकेचा तीव्र शब्दांत निषेध केला. ते म्हणाले की, अपेक्षेप्रमाणे पाकिस्तानने आपल्या संकुचित राजनैतिक लाभासाठी आणि प्रसिद्धीसाठी जागतिक मंचाचा गैरवापर केला आहे. पाकिस्तानी प्रतिनिधींनी लष्करी मुख्यालयाच्या निर्देशांचे पालन करण्याऐवजी स्वतःच्या देशातील नागरिकांच्या कल्याणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.



भारताची भूमिका आणि अल्पसंख्याकांचे अधिकार


रघु पुरी यांनी अधोरेखित केले की, सार्वभौम समानतेच्या तत्त्वावर आधारित अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षण करणे ही प्रामुख्याने प्रत्येक राष्ट्राची सार्वभौम जबाबदारी आहे. भारताच्या विविधतेची समृद्ध सांस्कृतिक परंपरा देशातील धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांसाठी असलेल्या भक्कम घटनात्मक संरक्षणातून स्पष्टपणे दिसून येते. तसेच, देशाच्या सर्वोच्च पदांपासून ते प्रमुख संस्थांपर्यंत आणि राष्ट्रीय विकासात अल्पसंख्याक समुदायांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.



पाकिस्तानवर तीव्र शब्दांत ताशेरे


धार्मिक अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यात आणि असुरक्षित समुदायांना सांभाळण्यात पाकिस्तान सातत्याने अपयशी ठरत आला आहे. असे असतानाही पाकिस्तानकडून धार्मिक स्वातंत्र्य आणि अल्पसंख्याकांच्या मुद्यांवर भारतावर खोटे आरोप करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानने आत्मपरीक्षण करून स्वतःच्या देशातील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करावे, असा सज्जड दम भारताने युनोच्या मंचावरून भरला आहे.

Comments
Add Comment

‘मन की बात’ला 12 वर्षे पूर्ण; पंतप्रधान मोदींचा आत्मनिर्भर भारत आणि ‘व्होकल फॉर लोकल’चा संदेश

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाला 12 वर्षे पूर्ण झाली आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा ड्रग्ज माफियांना इशारा! ‘तरुणाईशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही’; ड्रग्ज तस्करांविरुद्ध मोठी कारवाई?

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय सीमांचा गैरवापर करून देशाच्या युवा पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यात अडकवणाऱ्या

New Railway Rule: रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित होणार! २७ ऑक्टोबरपासून नवा नियम लागू

जेव्हा स्वस्त आणि आरामदायी प्रवासाचा विषय येतो, तेव्हा भारतीय रेल्वे अग्रस्थानी असते. दररोज लाखो लोक रेल्वेने

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ घोंघावणार! २८ ऑक्टोबरला आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता

भारतीय हवामान विभागाने आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टी भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. बंगालच्या

Indian Air Force : इंडो-पॅसिफिकमधील घडामोडींवर भारताचे बारकाईने लक्ष; राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी हवाई दल सज्ज

Indian Air Force: इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील अलीकडील घडामोडींमुळे अधिक सतर्क राहण्याची आणि प्रादेशिक सहकार्य वाढवण्याची

Digital Agriculture Mission: देशात 11 कोटी फार्मर आयडी बनवण्याचे लक्ष्य पाच महिने आधीच पूर्ण

नवी दिल्ली: केंद्र सरकारने निर्धारित मुदतीपूर्वीच देशात 11 कोटी शेतकरी विशिष्ट डिजिटल ओळखपत्रे (Farmer ID) तयार