Sunday, October 25, 2026

IPL 2027 मध्ये धोनी खेळणार की नाही? स्वत:च दिली फॅन्सला हिंट; व्हिडिओ जोरदार व्हायरल

MS Dhoni On IPL 2027: महेंद्र सिंग धोनीच्या फॅन्ससाठी महत्त्वाची बातमी आहे. धोनीने पहिल्यांदाच तो IPL 2027 मध्ये खेळणार आहे की नाही? या प्रश्नावर उत्तर दिलं आहे.

नवी दिल्ली: महेंद्र सिंह धोनीच्या फॅन्सच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या फॅन्सच्या मनामध्ये आपला आवडता खेळाडू महेंद्र सिंह धोनी IPL 2027 मॅच खेळणार का? सतत पडणाऱ्या प्रश्नाचं उत्तर अखेर फॅन्सला मिळालेलं आहे. स्वत: धोनीने या प्रश्नाचं उत्तर फॅन्सला दिलेलं आहे. धोनीने स्वतः या प्रश्नावर उत्तर देत सांगितले की, IPL 2027 मध्ये खेळण्याचा निर्णय त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल. डिसेंबरपूर्वी त्याची वैद्यकीय तपासणी केली जाईल आणि त्याच्या शारीरिक क्षमतेचे मूल्यांकन केले जाईल, त्या आधारावर धोनीने आपला निर्णय राखीव ठेवलेला आहे.

IPL 2027 साठी येत्या नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये मिनी लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावा पूर्वीपासूनच धोनीच्या फॅन्समध्ये आपला आवडता खेळाडू यंदाचा IPL चा हंगाम गाजवणार का? याची उत्सुकता होती. एका मुलाखतीतून धोनीने आपल्या फॅन्सला उत्तर दिले आहेत. महेंद्रसिंग धोनी हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या कर्णधार पदाच्या कार्यकाळात चेन्नई सुपर किंग्स टीमने पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे. मात्र, दुखापत आणि फिटनेसच्या समस्यांमुळे तो 2026 चा संपूर्ण आयपीएलचा हंगाम खेळू शकला नव्हता. त्याच्या गैरहजेरीमध्ये टीमची कामगिरीही फारशी दिलासादायक राहिली नाही. टीमला सलग तिसऱ्या वर्षी प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नाही.

 

IPL 2026 चा हंगाम धोनी खेळला नव्हता म्हणून, धोनीच्या फॅन्समध्ये तो रिटायर्ड होणार असल्याची चर्चा सुरू होती. पण वारंवार चेन्नई सुपर किंग्स टीमने मात्र त्या अफवा धुडकावून लावल्या होत्या. मात्र, अलीकडेच धोनीने दिलेल्या एका मुलाखतीतील उत्तराने सर्वच धोनीच्या फॅन्सचे लक्ष वेधून घेतले आहेत. धोनी पुन्हा धमाकेदार कमबॅक करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. बंगळूरुमधील एका कार्यक्रमादरम्यान धोनीला IPL 2027 मध्ये खेळणार आहेस का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना धोनी म्हणाला की, "मला आधी माझ्या फिटनेसबद्दलच्या काही चाचण्या करायच्या आहेत, त्या झाल्या की, माझं शरीर यंदाचं IPL चा हंगाम खेळण्यासाठी तयार आहे की नाही? हे ठरवेल."

"मला चेन्नई सुपर किंग्सच्या पिवळ्या जर्सीमध्ये खेळायचे आहे. पण तो निर्णय घेण्यासाठी मला माझ्या फिटनेसचे मुल्यांकन करावे लागेल. IPL चा पुढचा हंगाम खेळण्यासाठी मला डिसेंबरपूर्वी फिटनेस चाचणी करावा लागणार आहे. या दृष्टीने मला परिपूर्ण विचार करावा लागणार आहे.", असं धोनीने चाहत्यांना उत्तर दिले आहे. धोनीने पुढे सांगितलं की, “जर मी खेळण्यासाठी पुरेसा तंदुरुस्त नसेल, तर तो निरोगी आहे आणि पुढचा हंगाम खेळण्यासाठी फिट असेल तर, डॉक्टरांना सुनिश्चित करावे लागेल.” धोनीने स्वतःची तुलना एका जुन्या विंटेज कारशी करताना म्हणाला की, जुनी विंटेज कार रस्त्यावर सुरळीतपणे चालू ठेवण्याची जबाबदारी डॉक्टरांची असेल.”

धोनीच्या या विधानावरून स्पष्ट होते की, फिटनेस मूल्यांकनानंतरच धोनी IPL 2027 मध्ये परतणार की नाही? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या वर्षा अखेरी पर्यंत मिळणार आहे. धोनी IPL 2026 मध्ये खेळू शकला नाही. त्याची अनुपस्थिती चेन्नई सुपर किंग्ससाठी एक मोठा धक्का होता. पाच वेळचा चॅम्पियन असलेला हा संघ सलग तिसऱ्या हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचण्यात अपयशी ठरला. आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेला धोनी, चेन्नईसाठी नेहमीच एक महत्त्वाचा खेळाडू राहिला आहे. चाहते त्याच्या पुढील वाटचालीकडे उत्सुकतेने पाहत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >