AI मुळे नोकऱ्यांवर संकट? १० वर्षांचा अनुभव असलेल्या इंजिनिअरचा शेतीकडे वळण्याचा विचार!

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) झपाट्याने होणाऱ्या विकासामुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये नोकरीच्या भविष्याबाबत चिंता वाढत आहे. जवळपास १० वर्षांचा अनुभव असलेल्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने AI मुळे भविष्यात नोकऱ्या कमी होण्याची भीती व्यक्त करत शेती करण्याचा आणि स्वतःचे अन्न पिकवण्याचा विचार मांडला आहे. रेडिटवरील त्याच्या पोस्टमुळे AI चा रोजगारावर होणारा परिणाम आणि बदलत्या काळात कौशल्ये टिकवून ठेवण्याचे आव्हान यावर चर्चा सुरू झाली आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वेगानं वाढीमुळे अनेक तंत्रज्ञान व्यावसायिक त्यांच्या करिअरच्या भविष्याबद्दल चिंतेत आहेत. पारंपरिक तंत्रज्ञानाच्या नोकऱ्या दिवसेंदिवस दुर्मिळ होऊ शकतात या भीतीने, जवळपास १० वर्षांचा अनुभव असलेल्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने शेती करण्याचा किंवा स्वतःचे अन्न पिकवण्याचा गंभीरपणे विचार करत असल्याचे उघड केल्यानंतर रेडिटवर एक चर्चा सुरु झाली आहे. त्या अभियंत्याच्या मते, AI विकासाच्या गतीशी जुळवून घेणे कठीण झाले आहे, त्यामुळे मानव या तंत्रज्ञानाच्या प्रगतीशी किती काळ बरोबरी करू शकेल याबद्दल त्याला अनिश्चितता वाटते. त्याला भीती आहे की, AI प्रणाली अधिक गुंतागुंतीची कामे हाती घेतील तसतसे पुढील पाच ते दहा वर्षांत नोकऱ्या मिळवणे कठीण होऊ शकते.


'आपण एका अत्यंत विचित्र काळातून जात आहोत आणि आपण सर्वजण याच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. पण खरं सांगायचं तर आता आपल्याला ते जमेल की नाही हे मला स्वतःलाही माहित नाही. प्रत्येक गोष्ट मानवी मेंदूच्या आकलन क्षमतेपेक्षा जास्त वेगाने घडत आहे. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी शेती करण्याचा किंवा स्वतःचे अन्न स्वतः पिकवण्याचा विचार करत आहे. मला मनापासून वाटतं की ५-१० वर्षांत खऱ्या नोकऱ्या फारश्या शिल्लक राहणार नाहीत,' असे त्याने रेडिटच्या कम्युनिटीवरील एका पोस्टमध्ये लिहिले.



गोष्टी किती झपाट्याने बदलल्या आहेत यावर विचार करताना ते म्हणाले,'गेल्या वर्षभरात AI बद्दलचे त्यांचे विचार लक्षणीयरीत्या बदलले आहेत.' पूर्वी त्यांचा असा विश्वास होता की, जरी AI कोड लिहू शकत असले तरी, सिस्टम डिझाइन करण्यासाठी आणि गुंतागुंतीच्या प्रकल्पांवर देखरेख ठेवण्यासाठी अनुभवी सॉफ्टवेअर इंजिनिअर्सची अजूनही गरज भासेल. मात्र आता त्यांना वाटते की AI या जबाबदाऱ्या अधिकाधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकत आहे. AI साधने अधिक प्रगत होत असताना वेबसाईट्स विकसित करणे, गेम्स तयार करणे आणि सॉफ्टवेअर ॲज-अ-सर्व्हिस सर्व्हिस उत्पादने लाँच करणे यांचे मूल्य पूर्वीसारखेच राहील का, असा प्रश्नदेखील या अभियंत्याने उपस्थित केला.


त्यांच्या या पोस्टमधून रोजगारावर AI च्या होणाऱ्या परिणामांबद्दल तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये वाढणार चिंता दिसून येते. एकेकाळी जय कामांसाठी अनेक वर्षांचे प्रशिक्षण आणि अनुभव आवश्यक होता, ती कामे आता या प्रणाली करू शकत असल्यामुळे आपली कौशल्ये आणि करिअर कसे संबंधित राहतील, असा प्रश्न व्यावसायिक अधिकाधिक विचारत आहेत.

Comments
Add Comment

Nashik Crime : नाशिकमध्ये सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार! WhatsApp वर APK फाइल न उघडताच ज्येष्ठ वकिलाला 3.80 लाखांचा गंडा

Nashik Crime : सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन पद्धतींचा वापर केला जात असल्याचे समोर येत आहे.

Breaking : भांडुप स्थानकात ट्रॅक ओलांडताना एसी लोकलच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी अंत

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी सकाळी मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले.

Eknath Shinde : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत वेळेत द्या; ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी-चाऱ्याचे नियोजन करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या

महाराष्ट्राच्या मत्स्य व्यवसाय विभागाचे बजेट ५ हजार कोटींवर नेण्याचे लक्ष्य - मंत्री नितेश राणे

मुंबई : महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसायाला देशातील अग्रगण्य राज्यांच्या पंक्तीत आणण्यासाठी विभागाचे बजेट 212 कोटी

मुंबईत आठवड्यातून एक दिवस बांधकामे बंद ठेवा; वायुप्रदूषण रोखण्यासाठी मंत्री आशिष शेलार यांची महापालिका आयुक्तांना सूचना

मुंबई : मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी संपूर्ण मुंबई महापालिका क्षेत्रात आठवड्यातून एक दिवस

Devendra Fadnavis : 'महा कॅम्पा' निधीतून व्याघ्र प्रकल्पांतील गावांचे पुनर्वसन पूर्ण करा ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबई : व्याघ्र प्रकल्प आणि अन्य संरक्षित वनक्षेत्रांतील गावांच्या पुनर्वसनाची कामे महाराष्ट्र पर्यायी वनीकरण