Nashik : त्र्यंबकेश्वर येथे संत संमेलनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संत-महंतांशी संवाद

‘साधू-संत येती घरा, तोचि दिवाळी-दसरा’ या भावनेतून आज संतांच्या उपस्थितीत खरी दिवाळी साजरी होत असल्याचे सांगत, हे संमेलन केवळ राजकीय किंवा सामाजिक नसून आध्यात्मिक ऊर्जेचा उत्सव असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्पष्ट केले.

Nashik : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर आहेत. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित संत संमेलनाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशभरातून आलेल्या संत-महंतांशी त्यांनी संवाद साधत त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी ‘राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ असून, संतांच्या पायाशी नतमस्तक होऊन राज्यकारभार करणे हाच आमचा संस्कार आहे,’ असे प्रतिपादन त्यांनी केले.


भगवान त्र्यंबकेश्वर आणि गोदामाईच्या चरणी वंदन करून देशभरातून आलेल्या संत-महंतांची सेवा करण्याची संधी मिळणे हे आपले परमभाग्य असल्याचे शिंदे यांनी नमूद केले. ‘साधू-संत येती घरा, तोचि दिवाळी-दसरा’ या भावनेतून आज संतांच्या उपस्थितीत खरी दिवाळी साजरी होत असल्याचे सांगत, हे संमेलन केवळ राजकीय किंवा सामाजिक नसून आध्यात्मिक ऊर्जेचा उत्सव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी राजकारण हे समाजकारण, राष्ट्रसेवा आणि राष्ट्ररक्षणासाठी करण्याची शिकवण दिली. राजसत्ता हातात असली तरी आध्यात्मिक आणि धर्मसत्तेचे महत्त्व मोठे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.



दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहासाठी शिवसेनेची मदत


दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असल्याचे सांगत, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहासाठी शिवसेनेच्या वतीने मदत करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली. तसेच सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या १३ आखाड्यांतील संत-महंत आणि साधूंच्या भोजनाची व्यवस्था शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.



कुंभमेळ्याच्या कामांमुळे बाधित कुटुंबांचे पुनर्वसन करणार


सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांना पक्की घरे देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात येईल आणि कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. व्यापारी, दुकानदार आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास नियमानुसार मोबदला देण्यात येईल, तसेच साधुग्रामच्या भूसंपादनासंदर्भातील तक्रारी सोडवण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. त्र्यंबकेश्वर स्टेडियमसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून निधीचे नियोजन करण्यात आले आहे. नगरपरिषदेच्या प्रशासकीय भवनासाठीही आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


या संत संमेलनाला परमपूज्य जगद्गुरू स्वामी शांतिगिरी महाराज, महंत महामंडलेश्वर शिवगिरी महाराज, महंत सत्यगिरी महाराज, महंत धनंजयगिरी महाराज, महंत शंकरानंद सरस्वती महाराज यांच्यासह विविध आखाड्यांचे महामंडलेश्वर, संत-महंत, धर्माचार्य आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे, गोकुळ गीते, अजय बोरस्ते, विनय करंजे, विजय आमले, प्रवीण आमले तसेच शिवसेनेचे स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

Comments
Add Comment

AI मुळे नोकऱ्यांवर संकट? १० वर्षांचा अनुभव असलेल्या इंजिनिअरचा शेतीकडे वळण्याचा विचार!

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वेगानं वाढीमुळे अनेक तंत्रज्ञान व्यावसायिक त्यांच्या करिअरच्या भविष्याबद्दल चिंतेत

Uttarakhand CM Announcement : उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा : पर्यावरण मित्रांचे 'मानधन' लवकरच वाढवणार!

देहरादूनमध्ये महर्षि वाल्मिकी प्रकटोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा देहरादून : ऋषी-मुनींची पवित्र भूमी असलेल्या

Nashik : सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यासाठी त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या मार्गांत बदल, 30 व 31 ऑक्टोबरला वाहतूक निर्बंध लागू

Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंड आणि नवीन घाट

खर्गेंचे पंतप्रधानांबद्दलचे वक्तव्य हे काँग्रेसच्या सडक्या मानसिकतेचे प्रदर्शन - मंत्री नितेश राणे यांची टीका

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई-वडिलांबद्दल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलेले

Nashik : शिक्षण संस्थेतील अपहार प्रकरण ; माजी मुख्याध्यापकांसह पत्नी व सुनेचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

Nashik : मालेगाव तालुक्यातील टेहरे येथील समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या बँक खात्यांमधून ७० लाख ८२ हजार

Rashmika Mandanna Vijay Deverakonda : "होय, मी माझ्या जोडीदाराच्या प्रेमात वेडी आहे..." ट्रोलर्सना रश्मिका मंदानाची ८ पानांची चपराक; तर विजय देवरकोंडाची सुद्धा ट्रोल्सवर सडकून टीका

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandhana) आणि अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) यांच्या नात्याबद्दल सोशल