IND vs NZ 3rd T20: विजयाचे श्रेय फलंदाजांना, पण गोलंदाजांना श्रेयस अय्यरने नेमकी काय दिली होती वॉर्निंग?
भारताने पाच सामन्यांची टी20 मालिका तिसऱ्या सामन्यानंतरच खिशात घातली आहे. तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडची पिसं काढली. या सामन्यात अभिषेक शर्माने झंझावाती शतक ठोकलं. मालिका विजयानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने संघाचं तोंडभरून कौतुक केलं.
October 27, 2026 05:41 PM
IND vs NZ 3rd T20: विजयाचे श्रेय फलंदाजांना, पण गोलंदाजांना श्रेयस अय्यरने नेमकी काय दिली होती वॉर्निंग? (Photo: ANI)
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यानंतर भारताने मालिका खिशात घातली. या सामन्यात न्यूझीलंडने विजयासाठी 198 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारताने 13.2 षटकात 4 गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यात विजयाचा शिल्पकार ठरला तो श्रेयस अय्यर.. या विजयानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने संघाच्या कामगिरीचं कौतुक केलं.तसेच अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी आणि संजू सॅमसनच्या कामगिरीवर स्तुतीसुमनं उधळली. श्रेयस अय्यर म्हणाला की, 'अगदी अप्रतिम. ज्या प्रकारे ते फटके खेळत होते, ते डोळ्यांना खूप आनंद देणारे होते. तसेच, जेव्हा मी आणि संजू फलंदाजीला गेलो, तेव्हा चेंडू स्विंग होत होता आणि मला आश्चर्य वाटले की, त्यांनी हे कसे साधले? हे खरोखरच अविश्वसनीय होते.'
श्रेयस अय्यर फलंदाजीबाबत काय म्हणाला?
फलंदाजीची कामगिरी सर्वोत्तम आहे का? या प्रश्नावर श्रेयस अय्यर म्हणाला की, 'खरं सांगायचं तर 5 षटकांत 100 धावा करणे, मी यापूर्वी कधीही पाहिले नाही, विशेषतः आंतरराष्ट्रीय स्तरावर. आणि निश्चितच ही सर्वोत्तम कामगिरी आहे.' त्यांना फलंदाजीबाबत काय संदेश देशील? या प्रश्नावर श्रेयस अय्यर म्हणाला की, 'मला वाटते की हे आवश्यक आहे, विशेषतः परदेशात खेळताना. तुम्हाला माहित आहे की परिस्थिती वेगळी असणार आहे आणि तुम्हाला अनेक वेगवेगळ्या चेंडूंनी आव्हान दिले जाईल. आणि अशा अभूतपूर्व कामगिरीने यावर मात करणे, त्याचे श्रेय त्यांना द्यायलाच हवे, ज्या प्रकारे ते आज खेळले, ते विलक्षण होते. आणि अर्थातच, तिसरा सामना आणि अजून दोन सामने बाकी असताना मालिका जिंकल्यामुळे, मला आशा आहे की ते हाच फॉर्म कायम ठेवतील.'
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात अभिषेक शर्मा नावाचं वादळ घोंघावलं. न्यूझीलंडने भारतासमोर विजयासाठई 198 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्यामुळे ...
श्रेयस अय्यर गोलंदाजांना काय म्हणाला होता?
गोलंदाजांनी यॉर्कर टाकण्याबद्दल काय सांगितलं होतं का? यावर श्रेयस अय्यर म्हणाला की, 10 षटकांनंतर माझ्या लक्षात आले की ते जे काही हार्ड लेंथ किंवा अगदी हाफ व्हॉली टाकत होते, ते सर्व स्टँड्समध्ये जात होते. मी त्यांना सांगितले की शक्य तितके यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करा, अगदी सहा चेंडूंत यॉर्कर टाकले तरी चालेल. त्यांना सरळ जमिनीवर फटके मारायला लावा किंवा वाईड यॉर्कर आपल्याला या खेळपट्टीवर मदत करेल. आम्ही ते अमलात आणू शकलो आणि धावगती 8 ते 9 पर्यंत कमी केली.त्यामुळे त्यांना प्रति षटक 10 धावांवर रोखण्यात आम्हाला खूप मदत झाली. त्यांना 20 धावांच्या आत रोखण्याची आमची योजना यशस्वी झाली.'