
फ्रेंचायझींकडे बोली लावण्यासाठी किती पैसे?
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत एकूण 5 फ्रेंचायझी आहे. मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, युपी वॉरियर्स, गुजरात जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या फ्रेंचायझी आहे. युपी वॉरियर्सकडे या लिलावात खर्च करण्यासाठी सर्वाधिक रक्कम आहे. यूपी वॉरियर्सच्या खात्यात 3.75 कोटी रुपये आहेत. त्यामुळे खेळाडूंच्या खरेदीसाठी बिनधास्त बोली लावू शकतात. यात गुजरात जायंट्सकडे सर्वाधिक 1.25 कोटी रुपये आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे 1.15 कोटी, दिल्ली कॅपिटल्सकडे 1.10 कोटी, तर मुंबई इंडियन्सकडे 90 लाख रुपये आहेत. या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्सकडून अमेरिकेची डावखुरी वेगवान गोलंदाज तारा नॉरिसला ट्रेड केलं आहे.No more waiting 🥳
#TATAWPL 𝗔𝘂𝗰𝘁𝗶𝗼𝗻 𝗗𝗮𝘆 𝗶𝘀 𝗛𝗘𝗥𝗘 🔨 Catch the #TATAWPLAuction 2027 Today at 5.30 PM IST! https://t.co/n4lKWo8Zn5 — Women's Premier League (WPL) (@wplt20) October 28, 2026
कोणत्या संघाकडे किती जागा उपलब्ध आहेत?
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: जागा – 5, विदेशी खेळाडू – 2
- मुंबई इंडियन्स: जागा – 7, विदेशी खेळाडू – 1
- दिल्ली कॅपिटल्स: जागा – 5, परदेशी खेळाडू – 1
- यूपी वॉरियर्स: जागा – 7, परदेशी खेळाडू – 2
- गुजरात जायंट्स: जागा – 3, परदेशी खेळाडू – 1
भारताविरुद्धचा तिसरा टी20 सामना कुठे गमावला? न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर म्हणाला की...
न्यूझीलंडच्या वेलिंग्टनमध्ये तिसरा टी20 सामना पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. हा निर्णय ...





